Bol Maharashtra
मनोरंजन सामाजिक

शिक्रापूर(पुणे): अजिंक्यतारा इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन…!

प्रतिनिधि: संदीप ढाकुलकर
24/12/25
शिक्रापूर(पुणे): अजिंक्यतारा इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन…!

शिक्रापूर येथिल अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी वर्षअखेर हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडत असतो या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त छोट्या चिमुकल्यांनी विविध प्रकारचे अर्थपूर्ण नृत्य सादर केले जसे की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा , पर्यावरण विषयक नृत्य ,आणि भारतीय संस्कृतीचे जिवंत उदाहरण या नृत्याच्या माध्यमातून दिले, या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त छोट्या चिमुकल्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. या वेळेस अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष माजी सरपंच रामभाऊ सासवडे,केंद्रप्रमुख श्री अनिल पलांडे सर, कार्याध्यक्ष श्री भाऊसाहेब कापरे सर, उद्योजक श्री जयभाऊ विरोळे, उद्योजक श्री विजय नाना चौधरी, अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री शामराव सासवडे , प्राचार्य श्री संतोष मासाळकर आधी सह पालक वर्ग आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्याविष्कार करणाऱ्या छोट्या चिमुकल्यांना प्रतिष्ठान तर्फे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले

Related posts

अरुंद रस्ता, बेकायदेशीर लाईट्स; मुक्रामबाद मार्ग नागरिकांसाठी धोक्याचा

bol maharashtra

महाशिवरात्री निमित्य हायर कंपनीच्या मित्र परिवारातर्फे फराळाचे वाटप.!

bol maharashtra

निताताई राजेश आडे यांचा विजयाचा श्रीगणेशा..बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध निवड….!

bol maharashtra