Bol Maharashtra
Last 24 Hour निवडणूक महाराष्ट्र राजकारण सामाजिक

निताताई राजेश आडे यांचा विजयाचा श्रीगणेशा..बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध निवड….!

सामाजिक, धार्मिक संवेदनशील विविध लोकोपयोगी उपक्रमातून समाज सेवा करणारे आर्णी तालुक्यातील खेड गावचे भूमिपुत्र कामगार उपायुक्त राजेश आडे यांची समाजसेवेची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या त्यांच्या धर्म पत्नी सौ.निताताई राजेश आडे ह्या गणपती मंदिर ट्रस्ट खेड च्या अद्यक्षा म्हणून महिला स्वयंरोजगार,व्यसनमुक्ती,सांस्कृतिक जनजागृती चे कार्य करत असतात.

त्यांनी खेड बीड लोणी,अकोला व जवळा सारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य गरिबांना आरोग्यसेवा मिळावी म्हणून ना नफा ना तोटा या धर्तीवर रुग्णवाहिका सुरू केली त्यामुळे अनेक गरजू लोकांना वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते व अनेक रुग्णांचे त्यामुळे प्राण वाचले.

राजेश आडे हे सेवेतून सुट्टी काढून खेड ते माहूर पाई दिंडी काढतात यातून ते युवकांना अध्यात्म, व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण आदी संदेश देत असतात.

आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होतील यासाठी गेली दोन तीन वर्षे निता ताई  जवळा लोणी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या मद्यमातून सक्रिय आहेत.

त्यांच्या उमेदवारीला  स्थानिक कार्यकर्त्यांनी .किंचित विरोध केला होता पण निता ताई यांनी शेकडो महिलांना घेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला .आता यवतमाळ जिल्हा सहकारी मद्यवर्ती बँकेची निवडणूक आहे त्यासाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मधून बँक प्रतिनिधी निवड करण्यात येते  यावेळी प्रतिष्ठेचा विषय असलेल्या अकोला (खेड) वि.का.स.संस्था मधून बँक प्रतिनिधी म्हणून निता ताई राजेश आडे यांची अविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वी विजयी श्रीगणेशा झाला अशी चर्चा आहे.

बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध निवड झाली तेव्हा सोसायडी अद्यक्ष हरीश राठोड,उपदयक्ष पिंटू नागापूरे,जेष्ठ संचालक माजी सरपंच तुकाराम आडे,मोतीराम जाधव, हिंमत जाधव,डोमा राठोड,किशोर राठोड,मनोहर पवन,पंचफुला पवार, रुखमा राठोड,सचिव भूषण उमरकर यांनी निता ताई राजेश आडे यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

Related posts

निवडणुकीची ‘ओवाळणी’ संपली, लाखो बहिणींच्या ओवाळणीला केवायसीचे ग्रहण.

bol maharashtra

आर्णीतील मूस्लिम कब्रस्थान,व हिन्दु स्माशानभूमीत रस्ता,वाॅल कम्पाऊट व सौदरीकरण करण्यात यावे,अश्विनी देशमुख यांची मागणी..

bol maharashtra

प्रहार च्या शिरुर तालुका कार्याध्यक्षपदी संदीप ढाकुलकर यांची नियुक्ती…!

bol maharashtra