Bol Maharashtra
Last 24 Hour आंतरराष्ट्रीय ब्रेकिंग मोठी बातमी राष्ट्रीय

जेफ्री एफस्टीन फाईल कडे जगाचे लक्ष..भारतिय राजकारनात होईल भूकंप…?

अमेरिकी संसदेने घोषित केल्या नुसार १९ डिसेंबर ला कुख्यात लैंगिक तस्कर जेफ्री एफस्टीन फाईल जग जाहीर होणार आहे.
जेफ्री एफस्टीन हा अमेरिकेतील लहान असतांना गरीब मुलगा पण त्याच्या वर्ग मित्र जे श्रीमंत होते त्यांच्या आई वडीला सोबत समंध प्रस्तापित करून तो काही कालावधीत मोठा गुंतवणूकदार बनला या दरम्यान त्याचे समंध प्रचंड श्रीमंत व्यक्ती ज्यात,राजकारणी,उद्योगपती, खेळाडू,पत्रकार, लेखक यांचे सोबत त्याचे समंध आले.
म्हनतात ना संपत्ती चा मोह फार भयंकर व त्याही पेक्षा वासनांध व्यक्ती बेकार जेफ्री एफस्टीन ने झटपट श्रीमंती चा मार्ग शोधला
त्याने पैसा मिळवण्या साठी अल्पवयीन मुली ला नोकरी मॉडेलिंग चे अमिश दाखवत त्यांना श्रीमंत लोकांची शिकार व वासनेचे साधन बनवले त्यासाठी त्याने एक बेट विकत घेतले येथे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ला आमंत्रित करायचा व त्याच्या वासनेच्या आहारी अल्पवयीन मुलींना द्यायचा असे करून तो जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत आला पण पापा चा घडा एक दिवस भरतोच एकदा एका १४ वर्षीय मुलीने त्याच्या विरुद्ध तक्रार करण्याचे धाडस केले अन त्याच्या काळ्या साम्राज्य जे लपून होते ते उघड झाले.
जेफ्री ला १३ महिन्याची शिक्षा झाली दरम्यान तो दिवसा बाहेर व रात्री तुरुंगात असे.
इंग्लंड च्या एका भावी राजकुमार त्याच्या गळाला लागला होता.तेव्हा त्या राजकुमाराने हजारो पौंड रुपयात ते प्रकरण आपसी केले होते.
मात्र १३ महिन्याची शिक्षा पूर्ण झाल्यावर देखील जेफ्री ने त्याचे कुकर्म सोडले नाही.त्याचे काळे धंदे वाढत गेले त्याचे स्वतःचे विमान होते तो रशियातील अल्पवयीन मुली लाखो डॉलर्स ला पुरवायचा त्याने स्नानगृह शयनगृहात भीतीत छुपे कॅमेरे बसवले होते.
भविष्यात हे सर्व वापरून कधी आपण फसलो तर सुटका करण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून त्याने हे रचले होते.
मात्र पुन्हा एकदा तो फसला यावेळी अमेरिके चे विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प याचे नाव त्या सेक्स रॅकेट मध्ये आले पण निवडणुकीत बदनामी करण्यासाठी विरोधकांनी षड्यंत्र रचले असे सांगून सत्तेत आलो तर आपण हे प्रकरण उजेडात आणू असे आश्वासन ट्रम्प याने दिले होते.
पण सत्तेत आल्यावर ट्रम्प विसरायला लागले पण अमेरिकी काँग्रेस व तेथील मीडियाने प्रकरणात लक्ष घातले व अखेर ट्रम्प प्रशासनास झुकावे लागले ही आहे मीडियाची शक्ती..
जेफ्री एफीस्टन याचा संशयास्पद मृत्यु तुरुंगात झाला होता.
पण आता अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेने सुमारे १५ हजार पाणीदस्तावेज व काही फोटो व व्हिडीओ सार्वजनिक करण्यास १९ डिसेबर तारीख दिली.
त्यामुळे या फाईल मध्ये कोणाचे नाव फोटो व्हिडीओ असतील यावर चर्चा सुरू झाली आहे.
भारतातील एक दिवाळखोर मनमौजी उद्योगपती एक खेळाडू एक एक केंद्रातील प्रमुख नेता व एक मंत्री असण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.
पण भारतात कितीही मोठे प्रकरण असले तरीही तो मी नव्हेच असे म्हणत विरोधकांना टार्गेट करण्याची पध्दत आहे.
सत्तेला एकदा माणूस चिकटला की तो मरेपर्यंत सत्ता सोडत नाही हा येथील इतिहास पहाता भारतातील कोणाचे नाव त्यात आले तरी ए आय तंत्रज्ञान वापरून बदनाम करण्याचा प्रयत्न सांगून येथील बेशरम व्यवस्थेला काही फरक पडेल असे वाटत नाही
कारण नीतिमत्ता व नैतिकता ह्या बाबी फक्त वाचण्या पुरत्या भारतीय राजकारणात शिल्लक आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
रोख ठोक
बोल महाराष्ट्र संपादकीय
प्रमोद कुदळे
(संपादक)

Related posts

आर्णी नगरपरिषद कर मूल्य निर्धार आक्षेपास मुदतवाढ,गणेश हिरोळे यांच्या मागणीस यश…!

bol maharashtra

सशस्त्र सीमा बल जवानों ने चावल की तस्करी करते हुए एक तस्कर को पकड़ा

Web1Tech

परसोडा येथील मोक्षभूमी झाली पर्यटनभूमी…!

bol maharashtra