Bol Maharashtra
Last 24 Hour निवडणूक ब्रेकिंग महाराष्ट्र मोठी बातमी राजकारण

मुंबईत ठाकरे बंधूंना काका च्या तुतारी ची साथ.…!

मुंबई महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राज ठाकरे यांच्या मनसे ची युती जवळपास पक्की झाली असून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ठाकरे बंधू सोबत घेणार आहेत त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या कोट्यातील जागा सोडणार आहे हे खात्रीलायक वृत्त असून पुणेत शरद पवार यांची तुतारी घड्याळ सोबत जाणार नसल्याचे कळते.

तर मुंबई ठाणेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढतील तर ठाण्यात शिवसेना एकनाथ शिंदे व भारतीय जनता पक्षाने युती साठी अनेक बैठका घेतल्या असून अजून काही ठिकाणी पेच फसला आहे.

पुणेत भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असून छत्रपती संभाजी मगर मध्येही अजून भाजप शिवसेनेत पेच कायम आहे. नागपुरात तर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असून मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार स्वबळावर लढत असून अमरावती येथे भारतीय जनता पक्ष शिवसेना व आमदार रवी राणा  यांचा युवा स्वाभिमान  एकत्र लढण्याची तयारी करत आहेत

सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई महा पालिकेत ठाकरे बंधू यांना काकांच्या तुतारी ला सोबत घ्यावे लागत आहे.

Related posts

बिबट्याला हद्दपार करण्यासाठी शेतकरी एकवटले..!

bol maharashtra

2022 में उत्तर प्रदेश का विधान सभा चुनाव सेमीफाइनल नहीं फाइनल है – अखिलेश सिंह यादव

Web1Tech

नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी सामाजिक जाणिव जपत केले स्वखर्चाने कचरा कुंडी चे वाटप…!

bol maharashtra