Bol Maharashtra
निवडणूक महाराष्ट्र सामाजिक

दिलदार युवा नेता राजीव विरखेडे यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड…!

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बँक म्हणजे यवतमाळ जिल्हा सहकारी मद्यवर्ती बँक या बँकेची निवडणूक लवकरच लागण्याची लगबग सुरू झाली असून

बँकेवर मतदानाचा अधिकार हा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मधून बँक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात येते.अशा निवड झालेल्या प्रतिनिधीला बँक संचालक म्हणून निवडणूक लढवता येते.

आर्णी तालुक्यातील लोणी उमरी पठार सोसायटी मधून  आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती, आर्णी नगरपरिषद चे माजी उपादयक्ष राजू भाऊ विरखडे

यवतमाळ जिल्ह्यातील सहकार चळवळीला बळ देणारी आणि जनतेच्या विश्वासाला मान देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून पंचायत समिती आर्णीचे माजी सभापती तथा आर्णी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मा.राजूभाऊ वीरखेडे यांची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्याची “शेतकऱ्यांची बँक” म्हणून ओळख असलेल्या या प्रतिष्ठित संस्थेवर प्रतिनिधी म्हणून निवड होणे हे केवळ पद नसून,त्यांच्या दीर्घकाळच्या सामाजिक,राजकीय व सहकार क्षेत्रातील कार्याची पोचपावती आहे.ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर,सामान्य नागरिक यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारे नेतृत्व म्हणून राजूभाऊ वीरखेडे यांची ओळख संपूर्ण जिल्ह्यात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कार्यकाळात त्यांनी विकासकामे,जनतेच्या मूलभूत सुविधा,शेतकऱ्यांचे प्रश्न,सहकार चळवळीचे बळकटीकरण यासाठी नेहमीच ठाम भूमिका घेतली. त्यांच्या कार्यपद्धतीत प्रामाणिकपणा,पारदर्शकता आणि सर्वसामान्य माणसाशी असलेली आपुलकी दिसून येते.याच कार्याची दखल घेऊन त्यांची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे शेतकरी हिताच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळेल,सहकार क्षेत्र अधिक सक्षम होईल आणि ग्रामीण भागाच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल,असा विश्वास व्यक्त होत आहे.

 

Related posts

आर्णी नगरपरिषद कोणासही बहुमत नाही,युती शिवाय पर्याय नाही…!

bol maharashtra

कृष्णा पुसनाके,कॉम्रेड सचिन मनवर व प्रा.पंढरी पाठे यांनी दखल घेताच बोगस खवा-पेढा फॅक्टरी तात्काळ सील

bol maharashtra

हळव्यामनाचा दिलदार नेता गेला:माजी आमदार ख्वाजा बेग

bol maharashtra