Bol Maharashtra
ब्रेकिंग मोठी बातमी

आर्णी नगरपरिषद कर मूल्य निर्धार आक्षेपास मुदतवाढ,गणेश हिरोळे यांच्या मागणीस यश…!

वर्ष २०२५ सरता सरता आर्णी नगरपरिषद च्या सार्वत्रिक निवडणुक झाली मात्र नव्या कार्यकारणी ला पदभार घेण्यासाठी वेळ असतांना आर्णी नगरपरिषद ने रहवासी नागरिकांना नव्या अवाजवी कराचा शॉक दिला त्यामुळे आर्णीत नागरिक व व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

अचानक मोठ्या प्रमाणावर करात वाढ झाली कशी हा सामान्य प्रश्न नागरिकांना पडला उप करत देखील विचित्र रूपाने मागणी केली.

कर निर्धारित करण्यास नेमलेल्या एजन्सी ने इतर नगर परिषद पेक्षा जास्तीचे दर आकारले असा आरोप कवी विजय ढाले यांनी केला.

नव्या कर वाढी विरुद्ध आक्षेप नोंदवण्यात कमी कालावधी दिला असल्याने नगरपरिषद माजी सभापती गणेश हिरोळे यांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन सादर केले त्यास यश मिळाले असून आता आर्णी नगरपरिषद ने आक्षेव नोंदवण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

तसेच ज्या नागरिक किंवा व्यापारी यांच्या कडे थकीत कर आहे त्यांना आक्षेप नोंदवता येणार नाही असा नियम लावला होता मात्र जनमताचा रेटा पहाता तो नियम देखील रद्द करण्यात आला आहे..

*आज ज्ञानमंदीर येथे १/४/२६/पासुन वाढणाऱ्या नगरपरीषदच्या करवाढ संदर्भात ज्या लोकांनी आक्षेप दाखल केले होते.त्यांची सुनावणीची तारीख होती.त्या सुनावणी करीता नगपरीषद चे करविभागांतील कर्मचारी,नगररचना विभागातील अधिकारी ,नगरपरीषदची करप्रणाली यंञणा राबवीणारी (PMC)कंञाटदारांची मानसे हजर होती.ही मंडळी हजर होती.त्यात प्रामुख्यांने आर्णीतील नागरीकांनी काही मुद्दे उपस्थित केले होते.त्यात १)संपूर्ण आर्णीतील नागरीकांचा प्रस्तावित कर ऐवढा कसा वाढला?काशेट्टवार नावांच्या अमरावती येथील कंञाटदाच्या यंञणेने ही संपूर्ण प्रक्रीया राबविली असून त्यांना त्यांचे जवळजवळ आर्णी नगरपरीषद वर्षाचे १कोटी रुपये देतात.आर्णीत जवळपास १४हजार मालमत्ता आहेत.प्रशासकीय काळातच काही मिंटीग घेऊन कराचे झोन बदल करण्यांत आले,त्यामुळे करांत प्रचंड वाढ झाली.जुनेच झोन राहीले असते तर करवाढ झालीच नसते.करणे आवश्यकच असेल नविन आलेले नगराध्यक्ष व नगरसेवक करीत होते.प्रशासकांने का झोण बदलविले?हा मुद्दा होता.करमुल्याकंन दर जो २०१४-२०१५मध्ये २१८रुपये होता.तो अचाणकपणे २०२५मध्ये २०००रुपये कसा करण्यात आला?शिक्षण कर,वृक्षकर,उपकर हे अवास्तवपणे कसे वाढविण्यात आले?असे अनेक विविध प्रश्न विचारण्यांत आले परंतु यावर त्यांनी काही समाधान कारक उत्तरे दिली नाहीत.अनेकांना सुनावनीच्या नोटीस पोहचल्या नाहीत.काहीचे नाव वेगळे घराचा फोटो वेगळा,खाली प्लाटच्या नोटीस नाहीत.असे अनेक प्रकार झालेत.सर्वानी त्यांना सुनावनी समोर ढकलून,आक्षेपांसाठी आणखी दहा दिवसांची मुदत द्यावी अशी विनंती केली परंतु प्रशासन काही ऐकण्यांच्या मनस्थीतीत नव्हते.या वर एक मार्ग निघाला तो म्हणजे आक्षेपाची जी २६डिंसे तारीख होती ती वाढविली,टँक्स न भरता सुध्दा आक्षेप घेता येईल. या सर्व प्रकारांला नविन कार्यकारणी येई पर्यत स्थगिती द्यावी अशीच मागणी होती.त्यामध्ये प्रामुख्याने गणेश हीरोळे,प्रविण मुनगिनवार,धारीवाले,कांतीलालजी कोठारी,भिकूसेठ पटेल,शेख रब,जयंत डोल्हारकर,आबीद फानन,दर्शन कोषटवार,रवि नालमवार,विशाल देशमुख,राजु बुटले,प्रशांत निलावार,विठ्ठल देशमुख.असे अनेक जन उपस्थित होते.

Related posts

पुलिस अधीक्षक महोदय सिद्धार्थनगर द्वारा शुक्रवार की साप्ताहिक परेड का किया गया निरीक्षण

Web1Tech

आर्णी तालुका कृषी कार्यालयातील भ्रष्टाचारा विरुद्ध विजय राठोड यांचा एल्गार…!

bol maharashtra

महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल उद्या वाजणार…!

bol maharashtra