Bol Maharashtra
Last 24 Hour निवडणूक ब्रेकिंग महाराष्ट्र मोठी बातमी राजकारण

निवडणुकीच्या घोषणा होण्याआधी राज्य निवडणूक कार्यालयात मनसे चा खळखाट्याक…!

महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच त्या पूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळखट्याक आंदोलन केले.गेले अनेक दिवस मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या चुका वर निशाणा साधला होता त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आहे व निवडणूक आयोग व मनसे हा सामना रंगणार हे नक्की होते.

आज राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यात आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता मोठी बामती समोर आली आहे, ती म्हणजे या पत्रकार परिषदेपूर्वीच संतप्त मनसैनिकांनी मनसे स्टाईलने निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणक फोडले आहेत. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. मतदार यादी संदर्भात घोळ असल्या प्रकरणी मनसे कार्यकर्ते कळवा मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयामध्ये गेले होते, यावेळी ही घटना घडली आहे

Related posts

शिरूर नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचर्णे,भाजप चे मात्र सभागृहात वर्चस्व..!

bol maharashtra

पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांना मातृशोक..!

bol maharashtra

महापालिका रणांगण निवडणुकी ची घोषणा ,मुंबई साठी सर्वांचाच रहाणार जोर…!

bol maharashtra