Bol Maharashtra
धर्म - कर्म महाराष्ट्र मोठी बातमी सामाजिक

बंजारा समाजाची संस्कृती,विरासत जपण्यासाठी संजय राठोड यांनी केलेले परिश्रम उल्लेखनीय…!

बंजारा समाजाचा सांस्कृतिक वारसा विरासत जपण्यासाठी ना.संजय राठोड यांनी घेतलेले परिश्रम उल्लेखनीय असून बंजारा समाजा साठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी केले.

वाशीम जिल्ह्यातील #पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बंजारा समाजातील मान्यवरांना ‘सेवा पुरस्कार’ देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गौरविले.

यावेळी ते म्हणाले की बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल असा विश्वास याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतींनाही यावेळी अभिवादन केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे कार्यक्रम साधेपणाने घेतल्याचे नमूद करत देशभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या बंजारा समाजाचे स्वागत केले. समाजाची एकजूट हीच खरी ताकद असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.

पोहरादेवी ही संत सेवालाल महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून येथे आल्यावर वेगळी आध्यात्मिक ऊर्जा मिळते असे अधोरेखित करत हा संपूर्ण परिसर मोठे आध्यात्मिक आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे देखील याप्रसंगी स्पष्ट केले. मुख्यमंत्री असताना या विकास आराखड्यास ७२४ कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची आठवण करून देत संत सेवालाल महाराज स्मारकासह सर्व कामे वेगाने पूर्ण होतील अशी ग्वाही यावेळी दिली.

देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते येथे विरासत संग्रहालयाचे उद्घाटन झाल्याचाही उल्लेख करत हे स्मारक भविष्यात समाजाला व कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देणारे ठरेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.

Related posts

तपोवनाच्या वृक्षांना हरित लवादा ची ढाल..!

bol maharashtra

नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी सामाजिक जाणिव जपत केले स्वखर्चाने कचरा कुंडी चे वाटप…!

bol maharashtra

काका पुतण्या च्या युतीला अमित शहाचा हिरवा कंदील…!

bol maharashtra