Bol Maharashtra
सामाजिक

रुग्ण सेवेला समर्पित चंदन राठोड…! नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, लाभ घेण्याचे आवाहन…!

आर्णी तालुक्यातील आंबोडा येथील अत्यन्त साधारण कुटुंबातून जन्माला आलेला चंदन हा तरुण चंदना प्रमाणे गेली अनेक वर्षे रुग्ण सेवेसाठी झिजत आहे.

प्रामुख्याने ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत व आवश्यक उपचार मिळावे म्हणून चंदन राठोड सतत आरोग्य शिबिराचे आयोजन करत असतात.

पत्रकार म्हणून काम करतांना सर्वांशी प्रेमळ नाते निर्माण करणाऱ्या चंदन यांचा प्रशासकीय मंडळी सोबत उत्तम समंध आहेत त्याचा वापर ते वयक्तिक न करता सामान्य माणसाला मदत मिळावी म्हणून करतात.

भव्य मोफत डोळे निदान मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
आर्णी : दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती यवतमाळ ,बळीराजा चेतना अभियान द्वारे तालुका आरोग्य अधिकारी , ग्रामीण रुग्णालय आर्णी व ग्राम पंचायत कार्यालय लोणबेहळ अंतर्गत मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. वामनराव गावंडे, स्व. रामदासजी बंडे, स्व. प्रयागबई बंडे, स्व. सिमाताई राऊत, आणि स्व.सावित्रीबाई जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते चंदन राठोड व चंद्रकांत बंडे यांनी भव्य मोफत डोळे निदान मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरचे 27 मार्च रोज शुक्रवारी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र लोणबेहळ या ठिकाणी आयोजित केले असून अबाल वृद्धांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आयोजक चंदन राठोड यांनी गेल्या 23 वर्षा पासून इच्छाशक्ती व सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवित आहे.या शिबिराचे उद्घाटन डॉ.रमा बाजोरिया डॉ. सुनील भवरे, प्रल्हादराव इंगळे, भिकमचंद लोया व राजू इंगोले यांच्या शुभ हस्ते डॉ.कृष्णा राठोड,राजेश श्रीवास,श्रीराम राऊत, सुनील चोरडिया यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.शिबिराच्या अध्यक्षस्थानी लोणबेहळ येथील ग्रामपंचायत प्रशासक मोनिकाताई सुनील राठोड हे राहणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, ठाणेदार निलेश सुरडकर, आर.आर. खरोडे, नितीन वानखडे, डॉ.आरती नाटकर, विशाबंर जाधव, प्रकाश बुटले, यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. या शिबिरा दरम्यान डॉ. स्वप्नील तायडे डॉ. प्रतिक तायडे, प्रज्ञा खैरे हे डोळे निदान व मोतीबिंदू रुग्णांची तपासणी करणार आहे. या दरम्यान गजानन ऑप्टिकल यवतमाळ यांच्या कडून रुग्णांना अल्प दरात चष्मे देण्यात येणार आहे. सदर शिबिराच्या कार्यक्रमात मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची निवड करण्यात येणार आहे असून शिबिरा दरम्यान बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी ग्रामीण भागातील गोर गरीब अबाल वृद्धांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळी,ग्राम पंचायत लोणबेहळ यांच्या वतीने आयोजक चंदन राठोड, चंद्रकांत बंडे व राजू इंगोले यांनी केले आहे.

Related posts

अरुणावती नदी पुला वर लोखंडी कठडे बसवा सामाजिक कार्यकर्ते परवेज बेग यांची मागणी…!

bol maharashtra

प्रहार जनशक्ती पक्षाची गतिरोधक बसविण्याची मागणी..!

bol maharashtra

आर्णीत इतिहास घडणार, भक्तांच्या गर्दी चा रेकॉर्ड होणार…!

bol maharashtra