Bol Maharashtra
सामाजिक

शिक्रापूर (पुणे) केंदूर येथे विधवा महिलां साठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन समाजात समोरअनोखा आदर्श..!

 

वार्ताहर ✍🏻 संदीप ढाकुलकर

शिक्रापूर (पुणे) केंदूर येथे विधवा महिलां साठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन समाजात समोरअनोखा आदर्श..!

सोमवार दि. 19/01/2026 रोजी केंदुर येथील माहेर संस्थेच्या आनंद बालसदन शाखेच्या वतीने मकर संक्रांती निमित्त विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेऊन अनोखा संदेश समाजाला देऊन आदर्श निर्माण केला.
आपण सौभाग्यवतीं साठीच अनेक सण समारंभ सोहळे साजरे करतो पण आपण समाजात आजारपणा मुळे म्हणा वृद्धापकाळाने कुटुंबातील पुरुष इहलोक सॊडून स्वर्गवासी होतो यात त्यांच्या सौभाग्यवती चा दोष नसतो, पण पूर्वा पार रूढी प्रथा परंपरायाचा पगडा अजूनही आपल्याला पहायला मिळत आहे यामुळे विधवा महिला कायमच घरात बसून असतात बदलत्या काळा नुसार आपणही यांना रूढी प्रथा परंपरा यांना तिलांजली देऊन या महिला ही समाजात महत्वाच्या आहेत याही समाजाचा कुटुंबाचा भाग आहेत असं समजून नव समाजनिर्मिती कडे आपण आता जायला हवा हाच विचार घेऊन केंदूर माहेर संस्थेच्या शाखेच्या वतीने असा अनोखा हळदी कुंकू कार्यक्रम विधवा महिला साठी घेऊन साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना ‘सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. महत्वाचे हळदी कुंकू लावून वाण
म्हणून साड्या देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शर्मिला थिटे, मा,उपसरपंच,अश्विनी थिटे- माजी सरपंच केंदुर,योगिता थिटे-माजी उपसरपंच केंदुर तसेच पौर्णिमा प-हाड, कविता गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तर संस्थेच्या वतीने तेजस्विनी पवार प्रकल्प प्रमुख, राजू साकोरे,राजु तायडे, ऍड.आशाताई दळवी , मिनाताई भागवत व संस्थेतील मुले महिला उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस्विनी पवार यांनी केले तर सूत्रसंचलन ऍड आशा दळवी यांनी केले व आभार मीना भागवत यांनी मानले.

Related posts

अद्विता-अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड आर्णी ची ग्राहक व गुंतवणूकदारांसाठी आकर्षक व्याज दर योजना…!

bol maharashtra

शाश्वत उपजीविका कार्यात परसोडा ग्रामपंचायत अव्वल: रूपा भादलकर

bol maharashtra

गोरक्षकांनी दिले ६२ गाईंना जीवदान,पोलिसांनी केली सुटका…!

bol maharashtra