Bol Maharashtra
राजकारण सामाजिक

अखेर शिक्रापूरचा कचरा उचलण्यास सुरुवात प्रहार च्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी ..!

प्रतिनिधी शिक्रापूर 7/6/26

अखेर शिक्रापूरचा कचरा उचलण्यास सुरुवात प्रहार च्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी ..!

शिक्रापूर (पुणे) सणसवडी येथील ग्रामस्थानी कचरा टाकण्यास विरोध केल्यामुळे शिक्रापूर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते परिसरातील नागरिकांनी नवनियुक्त प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष संदिप ढाकुलकर यांना संपर्क साधत कचरा हटविण्याची विनंती केली सदर तक्रार ऐकून घेत संदीप ढाकुलकर यांनी ग्रामपंचायत सदस्या सौ पूजा भुजबळ,सदस्य निलेश थोरात.सदस्य विशाल खरपुडे यांचेशी संपर्क साधून कचरा हटविण्याची मागणी केली अखेर दहा दिवसानंतर शिक्रापूर परिसरातील कचरा हटविण्यास सुरुवात केली आहे कचरा उचलत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच नवनियुक्त उपसरपंच प्रकाश वाबळे यांची भेट घेत सदर प्रश्नावर चर्चा केली या चर्चे दरम्यान सरपंच रमेश गडदे,उपसरपंच प्रकाश वाबळे माजी उपसरपंच सौ पूजा भुजबळ ग्रामविकास अधिकारी श्री शिंदे साहेब उपस्थित होते.या पुढील काळात अशा प्रकारची गैरसोय होणार नाही असे आश्वासन नवनियुक्त उपसरपंच प्रकाश वाबळे,माजी उपसरपंच पूजा भुजबळ यांनी दिले

Related posts

आर्णीतील 9 वर्षांच्या आहिल महेमूद सोलंकीची प्रेरणादायी कामगिरी; पहिल्याच वर्षी पूर्ण केले 30 रोजे

bol maharashtra

रस्त्यात झाड लावून गांधीगिरी ..! प्रहार च्या आंदोलनास यश रस्त्याचे काम झाले सुरू.

bol maharashtra

महामार्ग अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘अघोरी पूजेचे’ घाट  (हिवरा संगमच्या तरुणाचे चक्क अनिसला पत्र ) 

bol maharashtra