Bol Maharashtra
महाराष्ट्र मोठी बातमी सामाजिक

रस्त्यात झाड लावून गांधीगिरी ..! प्रहार च्या आंदोलनास यश रस्त्याचे काम झाले सुरू.


विशेष प्रतिनिधी शिक्रापूर

प्रहारची रस्त्यात झाड लावून गांधीगिरी ..!

शिक्रापूर येथील मलठन फाटा येथील हॉटेल पाम अर्क जवळ बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले होते याच्या बऱ्याच तक्रारी परिसरातील नागरिकांकडून प्रहारचे शिरूर तालुका कार्यअध्यक्ष संदीप ढाकुलकर यांच्याकडे आल्या होत्या त्यांनी तातडीने दखल घेत या खड्ड्यात कुंडी लावून गांधीगिरी केली सदरची बाब शिक्रापूर ग्रामपंचायतला माहिती झाल्यावर शिक्रापूर येथील सरपंच रमेश गडदे यांनी त्वरित जेसीबीच्या सहायाने त्वरित खड्डे बुजवून आणि वल्लभ नगर येथील रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी केली या बद्दल कार्याध्यक्ष यांनी ग्रामपंचायत शिक्रापूर आणि सरपंच रमेश गडदे यांचे आभार व्यक्त केले .तसेच बुरुंजवडील येथील शिवन्या हॉटेल जवळ गतिरोधक बसविण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई पाचूंदकर यांच्याकडे केली आहे त्यांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे संदीप ढाकुलकर यांचेशी संपर्क केला असता आपण बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नेहमीच शेतकरी दिव्यांग आणि कामगार आणि समाजातील दुर्लक्षित घटकावर नेहमीच काम करू असे या वेळेस सांगितले

Related posts

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशन मधून क्रिकेट चा थरार…ए.पी.ए.चे आयोजन…

bol maharashtra

आर्णी नगरपरिषद मध्ये मनरेगा कक्ष स्थापन करण्याचे आव्हान…!

bol maharashtra

मुंबईत ठाकरे बंधूंना काका च्या तुतारी ची साथ.…!

bol maharashtra