Bol Maharashtra
धर्म - कर्म

भक्तीरसात आर्णी न्हाहून निघणार,भक्तांच्या गर्दी चा होणार नवा इतिहास आयोजन समिती,प्रशासन सज्ज,पंडित मिश्रा यांच्या अमृतवानीतून ३० मार्च पासून शिवपुरान कथेला सुरवात

भक्तीरसात आर्णी न्हाहून निघणार,भक्तांच्या गर्दी चा होणार नवा इतिहास आयोजन समिती,प्रशासन सज्ज,पंडित मिश्रा यांच्या अमृतवानीतून ३० मार्च पासून शिवपुरान कथेला सुरवात

आर्णी नगरात ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय कथा,प्रवचनकरार पंडित प्रदीप जी मिश्रा यांचे शिवपुरान कथा समारंभ…
ही शिवपुरान कथा आर्णी येथे मिळावी म्हणून गेली तीन वर्षे आर्णीतील भक्त मंडळी प्रयत्न करत होती.अखेर ३० मार्च ते ५ एप्रिल ही तारीख मोठ्या प्रयासाने मिळवण्यात आयोजन समितीला यश आले त्यासाठी सिहोर येथे आर्णीची आयोजन मंडळी जाऊन देखील आली.
जेव्हा पासून आर्णी च्या कथेची तारीख निश्चित करण्यात आली तेव्हा पासून आयोजन समिती दिवसरात्र मेहनत करत आहे.
कथे साठी स्थळ निश्चित करण्या पासून कथेस येणाऱ्या भाविक भक्तांच्या भोजन,वाहन पार्किंग करण्यात समिती चे सर्व लहान थोर भक्त कस्ट घेत आहेत.
‘श्री.बहिरम देव शिवपुरान कथा आयोजन समिती ट्रस्ट’ ने आर्णी च्या इतिहासात नवा धार्मिक आदर्श अध्याय निर्माण करण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे.
करता करविता ईश्वर जरी आहे तरी भाग्याने आपल्याला ही जवाबदारी मिळाली आहे असे मानून समिती मधील लहान थोर,गरीब श्रीमंत कुठलाही भेद न ठेवता
मिळेल ती जवाबदारी पार पाडत आहेत.
आर्णी ते जुना माहूर रोड वरील प्रिया नर्सरी समोरील श्री.भारती यांच्या शेतात ही शिवपुरान कथा होणार आहे .
आर्णी बसस्थानक वरून १ किमी चे कथा स्थळा चे अंतर असून बाबा कंबलपोष दरगाह दिग्रस चौफुली वरून ३०० मीटर अंतर आहे.
दिग्रस, पुसद,व राज्यातील त्या मार्गाने येणाऱ्या भाविकांच्या वाहना साठी दिग्रस रोड वरील पारधी बेडा समोर वाहनतळ निर्माण करण्यात आले आहे.
सोमवारी आर्णी चा आठवडी बाजार असतो पण शहरात एकच रस्ता असल्याने भाविकांना वाहतूकी चा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने सोमवारी बाजार बंद ठेवला यास सर्वांनी उस्फुर्त प्रतिसाद देखील दिला आहे.
शेवटी ही शिव महापुराण कथा ही इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहली जाईल अशी व्हावी म्हणून
आयोजन समिती ने अतिशय काटेकोर नियोजन केले आहे.आयोजन करतांना भक्तांना सुविधा व सेवा व्हावी म्हणून हजारो महिला,पुरुष, युवक,युवती यांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे
त्या स्वयंसेवका वर विविध प्रकारच्या जवाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
या आयोजनात महसूल व पोलीस व नगरपरिषद प्रशासन देखील सज्ज आहे.
कथे दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात रहाणार असून त्यासाठी नियोजना चि जिल्हा स्तरावर पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी बैठक सुद्धा घेतली होती.
आता आर्णी येथे आयोजित या धार्मिक पवित्र शिवपुराण कथेस यशस्वी करण्यासाठी समिती अहोरात्र मेहनत घेत आहे
कथा श्रवण करण्यास महिला भाविक मोठ्या प्रमाणात येतात त्यावेळी लाखोची गर्दी होणार आहे त्यामुळे महिलांनी आपल्या सोबत मौल्यवान दागिने,पर्स आणू नये.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने कथा स्थळी पिण्याचे पाणी तर उपलब्ध आहे तरीही गर्दी मुळे पाण्याची बॉटल सोबत ठेवावी
अतिशय शांततेत कुठलीही गडबड घाई न करता कथा स्थळ गाठावे.
भाविकांना जर कुठलीही संशयास्पद वस्तू वाटली तर जवळ असलेल्या पोलीस किंवा स्वयंसेवक यांना सूचना द्यावी.
आरोग्या बाबत देखील आयोजन समिती जागरूक असून कथा स्थळी आरोग्य यंत्रणा असणार आहे त्यात डॉक्टर प्रथमोपचार औषध,रुग्णवाहिका याचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यात कुठेही झाले नसेल एव्हढे सुंदर आयोजन आर्णीत होत आहे
शेवटी भाविक भक्त व आर्णीकर नागरिक यांनी या ऐतिहासिक क्षणाला यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे असे विनम्र आवाहन आयोजन समिती कडून करण्यात आले आहे.

Related posts

बाबा कंबलपोष दरगाह कमिटीचा उपक्रम देत आहे हजारो गरजूंना मायेची ऊब…!

bol maharashtra

आर्णी महापुरान कथे दरम्यान मुस्लीम समाजाने जपला धार्मिक सदभाव…!

bol maharashtra

तळणी येथे रमजान ईद आनंदात व उत्साहात साजरी

bol maharashtra