Bol Maharashtra
धर्म - कर्म सामाजिक

आर्णी महापुरान कथे दरम्यान मुस्लीम समाजाने जपला धार्मिक सदभाव…!

आर्णी नगरी ही एकतेचे प्रतीक असून येथे हिंदू मुस्लिम ऐक्य कायमस्वरूपी टिकून असते.

आर्णी शहराला लगत  असलेल्या अरुणावती नदी वाहते त्या तिरावर बाबा कंबलपोष दरगाह बच्चू बाबा दरगाह व सिद्धेश्वर महादेव मंदिर असून येथे मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम भाविक  येतात दरवर्षी येथे कंबलपोष उर्स भरते. त्यात लाखो हिंदू मुस्लिम धर्माचे भाविक सहभागी होतात.

आता बहिरम  देव शिवपुरान कथा आयोजित केली आहे या कथेसाठी लाखो भाविक उपस्थित  रहाणार आहेत त्या भक्तासाठी थंड शरबत देण्यासाठी मुस्लिम समाजातील युवक सरसावले असून त्यांनी थंड शरबत पाजन्याचे पवित्र काम करून धार्मिक ऐकतेचा संदेश दिला आहे.

हिंदू -मुस्लिम ऐकतेच प्रतीक म्हणून परिसरात ओळख असलेल्या आर्णी येथे आज पासून शिवमपुराण ला सुरवात झाली.
पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे सुमधुर वाणीतून शिवमहापुराण श्रवण करण्यास झालेल्या तोबा गर्दीस येन उन्हाळ्यांत तहान भागवीन्यास, शहरातील मुस्लिम युवकानी पुढाकार घेत आज पहिल्याच दिवशी थंड पानी व शरबत व्यवस्था केली.
आर्णी नगरपरिषद चे आरोग्य सभापती अन्वर पठान, लाला फाजलानी, जावेद सोलंकी, जानी सोलंकी, युनूस शेख यांचे सह अनेक मुस्लिम युवकानी यात सहभागी होऊन दखल पात्र कार्य केले. यावेळी रवी नालमवार, पुरुषोत्तम इंगोले उपस्थित होते.

Related posts

बाबा कंबलपोष दरगाह कमिटीचा उपक्रम देत आहे हजारो गरजूंना मायेची ऊब…!

bol maharashtra

सुनेत्राताई पवार होणार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस ची धुरा देखील सांभाळणार…!

bol maharashtra

नाम फाउंडेशनचा मायेचा हात; सिरेसायगावात गरजू महिला शेतकऱ्यांना बियाणे वाटप

bol maharashtra