Bol Maharashtra
धर्म - कर्म सामाजिक

बाबा कंबलपोष दरगाह कमिटीचा उपक्रम देत आहे हजारो गरजूंना मायेची ऊब…!

बाबा कंबलपोश म्हणजे आर्णीचे थोर संत एकता बंधुत्व व प्रेमाची शिकवण देत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे संत.

बाबा कंबलपोश अरुणावती नदी तिरावर वसलेला बाबांचा दरगाह आहे येथे बाराही महिने हजारो भक्त दर्शनासाठी येतात. त्यावेळी बाबांच्या मजारी वर समाधी वर फुलांची व कापडी चादर चढवण्यात येते.

मात्र दरगाहचे नियोजन व देखभाल करण्यासाठी   असलेल्या दरगाह ट्रस्ट ने एक निर्णय घेतला की बाबांची आवडती कंबल म्हणजे घोंगडी(ब्लँकेट) जर भक्तांनी अर्पण केली तर त्या कंबल गोर गरीब गरजू लोकांना उपयोगी पडेल.मग त्यांनी आवाहन केले अन भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

जमा झालेल्या सर्व कंबल मग दरगाह ट्रस्ट ने अनाथ आश्रम,वृद्ध आश्रम,शासकीय रुग्णालयात वाटप करून मायेची ऊब दिली.आजही हा सामाजिक उपक्रम सुरू आहे.

Related posts

भीमा कोरेगाव विजयस्तंभ कार्यक्रमासाठी वाहतूक बदल चाकण, शिक्रापूर, वाघोली मार्गांवर निर्बंध

bol maharashtra

१४ मुलाच्या आई ने विकली ६ मुले..?तपास सुरू दत्तक दिल्या चा आई चा दावा..!

bol maharashtra

मराठा सेवा संघाने समाजाला वैचारीक शिवजयंती दिली – आ.अभिजित पाटील

bol maharashtra