Bol Maharashtra
मोठी बातमी राजकारण सामाजिक

सुनेत्राताई पवार होणार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस ची धुरा देखील सांभाळणार…!

राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे विमान दुर्घटना होऊन दुःखद निधन झाले.

तीन दिवस लोटत नाही तोच स्व.अजित पवार यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण ही चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व नेते आमदार  यांची बैठक होऊन त्यात खासदार सुनेत्रा ताई अजित पवार यांची गटनेते पदी एकमताने निवड  करण्यात आली. त्यामुळे आज सायंकाळी ५ वाजता अगदी साध्या पध्दतीने शपथविधी पार पडणार आहे.

सुनेत्रा पवार बारामती टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्ष आहेत आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या मुख्याधिकारी आहेत. त्यांना जय पवार आणि पार्थ पवार ही दोन मुले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या बारामतीमधून लोकसभेच्या उमेदवार होत्या.  मात्र नणंद खा.सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला होता.

महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि लोकसभा खासदार पदमसिंह पाटील हे त्यांचे भाऊ आहेत.

सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री होणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.

Related posts

वल्लभ नगर मल ठण फाटा येथे महिला दिन साजरा ..!

bol maharashtra

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्यासाठी अभिनव सुरवात करणारा अवलिया कवी विजय ढाले….!

bol maharashtra

आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी येथील जन्म मृत्यू नोंद,बिहार च्या दुबेला अटक,किरीट सोमय्या काय भूमिका घेणार…?

bol maharashtra