Bol Maharashtra
सामाजिक साहित्य

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्यासाठी अभिनव सुरवात करणारा अवलिया कवी विजय ढाले….!

  1. ज्यांना त्यांची ओळखच एका वऱ्हाडी कवितेने दिली. गावात झालेल्या ६३ व्या विदर्भ साहित्य संमेलनातून रसिक श्रोते समीक्षक सर्वांनी त्यांना डोक्यावर घेतले.

पुढे सलग ३ वेळा अखिल भारतीय  संमेलनात राज्य भर विजय ढाले यांच्या कविता गाजल्या लोकांचे अफाट प्रेम मिळवले…लेखन सुरूच होते  जगात समाजात घडणाऱ्या सर्व बाबी वर रोख ठोक मत मांडून लेखणीतला विद्रोह कवी लेखक गझलकार विजय ढाले यांनी जिवंत ठेवला.

त्यांनी लिहलेला बिब्बा हा काव्य संग्रह तुफान गाजला साता समुद्रा पार विजय यांचे काव्य पोहचले.काव्यसंग्रह म्हणजे पुस्तक त्यात मग जाहिरात आल्या पण या धोरणास मूठ माती देत आपल्या संग्रह विक्रीतून  येणाऱ्या पैशातून अनेक कार्यक्रम करत मिळणाऱ्या मांढणाच्या रकमेतून विजय या दिलदार माणसाने गोर गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून ते पैसे दिले अन गाडगेबाबा विचार व कृतीतून दाखवले.

का उगी समशेर हाती वार झाले पाहिजे…तह असो वा युद्ध वैरी ठार झाले पाहिजे हा विचार सांगणारे विजय  भगवान बुद्धा चे विचार पेरतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा झेंडा खांद्यावर घेत सर्व धर्म समभावाचा विचार पेरत असलेला हा अवलिया कवी विजय ढाले हे शेतात राबतात सेंद्रिय शेती चा प्रसार ते करत शेतकऱ्यांना होणारे दुःख  येणाऱ्या अडचणी कवितेतून मांडतात.

महा विद्यालयात प्रबोधनास जाऊन शेती,माती गाव खेडे,व्यसनमुक्ती स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवराय, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगतात त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करतात

विजय ढाले हे एक अजब सत्याग्रही अजब रसायन शेतीला जोड धंदा आधी स्वतः पासून सुरवात करून समाज माध्यमाचा प्रभावी वापर करत शेतकरी जागृती, प्रबोधन सतत करतात.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने पट संख्येचा आधार घेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयास विजय ढाले नावाच्या अवलिया कवी साहित्यिक माणसाने एकट्याने लढा सुरू केला त्यासाठी त्याने अभिनव मार्ग अवलंबला.गळ्यात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा फोटो अटकऊन  सायकल ला एक दान पेटी बांधली व शाळा मराठी शाळा वाचवण्यासाठी भीक मागितली.याची दखल राज्यात घेतल्या गेली.आमदार विजय वड्डेटीवार यांनी सभागृहात मांडली.. नंतर विविध राजकीय पक्ष व नेत्यांनी हा मुद्दा उचलला पण खरी सुरवात या लढ्याची आर्णीतून विजय ढाले या मराठी भाषा व जिल्हा परिषदेच्या शाळेवर प्रेम करणाऱ्या कवी व संवेदनशील मनाच्या सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी शेतकरी साहित्यिकाने केला यापुढे जर सरकार कोणाचेही असो जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतील तर विजय ढाले यांचा सनदशीर मार्गाचा लढा सुरू होईल अन आता मात्र राज्यातील नव्हे देशातील मराठी भाषिक त्यांच्या सोबत असतील….!

प्रमोद कुदळे

Related posts

दिन दुबळ्या च्या सेवेत च खरा देव:रामराव पाटील राऊत..!

bol maharashtra

आर्णी च्या एन एम जी ग्रुप चा सामाजिक आदर्श,संदल च्या खर्चाचे पैसे दिले कॅन्सरग्रस्त रुग्णांस…!

bol maharashtra

निवडणुकीची ‘ओवाळणी’ संपली, लाखो बहिणींच्या ओवाळणीला केवायसीचे ग्रहण.

bol maharashtra