Bol Maharashtra
धर्म - कर्म बिना केटेगरी सामाजिक

तळणी येथे रमजान ईद आनंदात व उत्साहात साजरी

तळणी येथे रमजान ईद उत्साहात साजरी

तळणी

समस्त मुस्लिम बांधवांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचे उपवास संपून पवित्र रमजान इदीने सांगता झाली,स 8:30 वा येथील मस्जिदिसमोरून सर्व मुस्लिम बांधव इदगाहकडे रवाना झाले, 9 वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली, मौलाना मुफ्ती शेख हबीब शेख जिलानी यांनी यावेळी पवित्र कुराणचे पठण केले,मौलाना मुश्ताक शेख यांच्या मागेे नमााज पडल्यावर सर्वांनी आपसात गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या,यावेळी मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवानी शुभेच्छा देऊन धार्मिक सौहार्दतेचे दर्शन घडविले,धार्मिक सदभावाने हर्षोल्हाासात ईद साजरी करण्यात आली, उत्साहपूरण वातावरणात इदगाहवर नमाज अदा करण्यात आली .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील पोटगंटवार यांनी सर्व मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी नजीर खान, इशाक शेख, शेख रशीद, युनूस खान ,अजीमभाई ,शेख मोईद्दीन ,सय्यद अन्सार, केशव लोणकर , सय्यद कदीर , शाहिद खान,निशांत हलबी उपस्थीत होते.घाटंजी पोलीस स्टेशनकदून यावेळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related posts

स्व.अजित दादांना आर्णीत श्रद्धांजली, परवेज बेग मित्र परिवारा कडून श्रद्धांजली सभेचे आयोजन..!

bol maharashtra

आर्णी महापुरान कथे दरम्यान मुस्लीम समाजाने जपला धार्मिक सदभाव…!

bol maharashtra

मंत्री गिरीश महाजन यांचा वंचित बहुजन आघाडीने नोंदवला निषेध..!

bol maharashtra