Bol Maharashtra
मोठी बातमी राजकारण

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रात शिवसेची शक्ति वाढली,अनेक दिगग्ज शिवसेनेत…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व सहकार क्षेत्राच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जोरदार हादरा बसला असून घाटंजी तालुक्यातील राजकारण व समाजकारण आणि सहकार क्षेत्रात पकड असणाऱ्या अनेकांनी यवतमाळ जिल्ह्याचे  पालकमंत्री  विकास पुरुष ना.संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेऊन धनुष्यबाण हाती घेतला.

घाटंजी येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रात होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड झाले आहे.

घाटंजी येथे झालेल्या पक्ष प्रवेशा साठी पश्चिम विदर्भ शिवसेना समन्वयक पराग पिंगळे,सलीम खेतांनी जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, युवा सेना पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.शेवटी जिल्ह्याचे

विकास पुरुष नामदार संजय भाऊ राठोड यांचे नेतृत्व स्वीकारत अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला.

सुपनाथ मंगल कार्यालय, घाटंजी येथे शिवसेना घाटंजीच्या वतीने आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.ह्या प्रसंगी अभिषेक पाटील ठाकरे व आशिष लोणकर ह्यांचे सोबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवकांनी ना संजय राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

सर्वांचे स्वागत करत, त्यांच्या या निर्णयामुळे घाटंजीमधे पक्ष अधिक बळकट होईल, असा ना संजय राठोड यांनी विश्वास व्यक्त केला.ह्या प्रसंगी सलीमभाई खेतांनी,पराग पिंगळे,हरिहर लिंगनवार,राजुदास जाधव,विष्णू उकंडे, सुरेश चिंचोळकर,संजय हातगावकर,साजिद शेख, दीपक कोकास, आशिष कुळसंगे, स्नेहल भाकरे, विशाल गणात्रा,आकाश राठोड,निलेश चव्हाण,महेश पवार,प्रद्युमन जवळेकर यांचेसह शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते

Related posts

सादिक शेख यांनी हाती बांधले घड्याळ न.प.निवडणुकी च्या तोंडावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का..!

bol maharashtra

किरीट सोमय्या यांच्या त्या दौऱ्याने आर्णीत विविध चर्चेला पेव…!

bol maharashtra

संदीप ढाकुलकर यांची राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता . सचिव पदी निवड

bol maharashtra