Bol Maharashtra
गुन्हा

दोन वर्षापूर्वीची यश गायकवाड हत्या प्रकरण उघड करण्याची ग्रामस्थ आणि नातेवाईक यांची मागणी ..!

प्रतिनिधी संदिप ढाकुलकर

दोन वर्षापूर्वीची यश गायकवाड हत्या प्रकरण उघड करण्याची ग्रामस्थ आणि नातेवाईक यांची मागणी ..!

शिक्रापूर (पुणे) दहिवडी येथे झालेल्या साई मांजरे हत्या प्रकरणात आरोपी असलेला अक्षय दत्तात्रय मांजरे याची कसून चौकशी चालू असून अजून काही धागे दोरे मिळतात की काय याची तपासणी पोलिस करत आहेत मागे दोन वर्षापूर्वी झालेली हत्या सुद्धा याच आरोपींने केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे त्या वेळी बिबट्याच्या हल्ल्याचे कारण देत पोलिसांनी तपास थांबविला होता जर का वेळेवर या हत्येचा तपास पोलिसांनी केला असता तर परवा झालेली घटना झालीच नसती असे दहिवडी येथील नागरिकांनी सांगितले आहे यश गायकवाडच्या हत्येची पुन्हा चौकशी व्हावी असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते मागील झालेल्या खुनाची परत चौकशी करण्यासाठी दहिवडकर ग्रामस्थ पोलिस अधीक्षक आणि जिल्हा अधिकारी यांना निवेदन देणार आहे असे वृत्त आहे सदर निवेदन दिल्यानंतर जर परत चौकशी नाही झाली तर ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते या खुनातील आरोपी अक्षय दत्तात्रय मांजरे वय २२ वर्ष राहणार दहिवडी याचा आणखी गुरु किवा साथीदार असण्याची शक्यता ग्रामस्थाकडून वर्तविण्यात येत आहे . निवेदन दिल्यांनंतर पोलिस अधीक्षक यश गायकवाडच्या हत्येची परत चौकशी पोलिस प्रशासन करेल का हे पाहणे महत्त्वाचे. ठरेल

Related posts

आर्णी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला…!

bol maharashtra

सहा महिने अनेकांना मूर्ख बनवणारी तोतया महिला आय ए एस..!

bol maharashtra

एकट्या रुपाली चाकनकरच का सर्वांची चौकशी व राजीनामा झाला पाहिजे: रेवननाथ गायकवाड.

bol maharashtra