Bol Maharashtra
Last 24 Hour गुन्हा महाराष्ट्र राजकारण

एकट्या रुपाली चाकनकरच का सर्वांची चौकशी व राजीनामा झाला पाहिजे: रेवननाथ गायकवाड.

श्री रेवणनाथ शांताराम गायकवाड (युवासेना उपजिल्हाप्रमुख पुणे – उ.बा.ठा) यांनी खरात प्रकरणावर जाहीर निषेध व्यक्त केला असुन या भोंदू बाबा ने अनेक महिलांचे लैंगिक शोषण करत त्यांच्यावर अन्याय केला आहे तो निंदणीय आहे, खरात महाशयास फाशीची शिक्षा झाली पाहीजेच परंतु कॅप्टन अशोक खरात प्रकरणात महीला आयोगाच्या मा.अध्यक्षा सौ रुपाली चाकणकर यांचा एकटीचाचं हाकनाक बळी घेतला जातोय असेही वक्तव्य गायकवाड यांनी केले !!
जर या प्रकरणी देशाचे ग्रुहमंत्री अमित शाह साहेब,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री सुनील तटकरे,मंत्री श्री दिपक केसरकर, मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री श्री चंद्रकांत पाटील,आमदार जयंत पाटील,खासदार श्री निलेश लंके,खासदार श्री श्रीकांत शिंदे इत्यादी तसेच डझनभर मंत्री , खासदार,आमदार,प्रशासकीय अधिकारी यांचे फोटो प्रसिद्ध झाले असतील तर मात्र एकट्या चाकणकरांवर च एवढी आगपाखड कशासाठी ??
राज्यातील अनेक असंतुष्ट महीला पदाधिकारी ज्यांची लायकी नाही अशा महिला पदाधिकारी त्यांच्या पदाच्या खुर्चीवर डोळा ठेऊन पातळी सोडून टिका करताना मोकाट पिसाळलेल्या अवस्थेत आहेत.
जर चाकणकरांचा राजीनामा घेतला गेला असेल तर ?? माझा प्रश्न आहे की,ज्या ज्या मंत्री आमदार, खासदार समवेत त्या खरात हरामखोराचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत त्यांना सुध्दा आपापल्या पदांचा राजीनामा द्यायला लावला पाहिजे आणि नैतिकतेने त्यांनी तो दिला पाहिजे तसेच त्यांच्यावर पण कडक कारवाई करावी ही मागणी समस्त नागरिकांकडून होत आहे अशी माहिती रेवणनाथ गायकवाड यांनी प्रेस नोट द्वारे आणि माध्यमाशी बोलताना दिली

Related posts

अखेर अनवर पठाण यांची तक्रार खरी ठरली,एम डी ड्रॅग चा पर्दाफाश…!

bol maharashtra

आरोपीला गजाआड करणारा गेला पिंजऱ्यात.. त्या लाचखोर अधिकाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी..!

bol maharashtra

आ. प्रा.राजू तोडसाम यांच्या वाढदिवसा निमित्ताने रोगनिदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद..७५२ रुग्णांची तपासणी…!

bol maharashtra