Bol Maharashtra
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन रुपाली चा वाद एकीला भोवला..!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकनकर व पुणे तील फायरब्रॅन्ड नेत्या ऍड रुपाली ताई ठोंबरे यांच्यात गेल्या काही दिवसात चांगलाच वाद रंगला होता

गेल्या काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे पाटील या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना दिसल्या. आता त्यांची पक्षातील पदावरून उचलबांगडी केली आहे

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करणं रुपाली ठोंबरे पाटील यांना चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने रुपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं होतं. पण ठोंबरे पाटील यांचा खुलासा येण्यापूर्वीच राष्ट्रवादीने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ठोंबरे पाटील यांची पक्षातील पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील या काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रुपाली ठोंबरे पाटील या अजितदादा गटाच्या प्रवक्त्या होत्या. राष्ट्रवादीने त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्यासोबतच आमदार अमोल मिटकरी आणि वैशाली नागवडे यांनाही प्रवक्ते पदावरून काढण्यात आले आहे. राष्ट्रवादीने आज नव्या 17 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. यात रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव नाहीये. तर हेमलता पाटील आणि प्रतिभा शिंदे यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीने अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर आणि श्याम सनेर यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच आधीच्या प्रवक्तेपदाच्या सर्व नियुक्त्या रद्द केल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

Related posts

आरोग्य सेवे चे कार्य प्रशंसनिय:माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस च्या आरोग्य सेवेला उस्फुर्त प्रतिसाद..!

bol maharashtra

सीमा त्रिनयन कळमकर जिल्हा परिषदेच्या आखाड्यात. वाढता प्रतिसाद..!

bol maharashtra

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्राताईंनी केली भावूक पोस्ट,स्व.दादांची शिकवण हेच बळ..!

bol maharashtra