Bol Maharashtra
राजकारण सामाजिक

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : बहुजन,कष्टकरी व वंचित घटकांच्या अपेक्षांचा विश्वासघात:नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे..

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : बहुजन,कष्टकरी व वंचित घटकांच्या अपेक्षांचा विश्वासघात

आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष,गटनेते तथा नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.हा अर्थसंकल्प बहुजन समाज,कष्टकरी,शेतकरी,कामगार,महिला व युवकांच्या मूलभूत प्रश्नांना स्पर्शही न करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महागाई नियंत्रण,रोजगारनिर्मिती,सामाजिक सुरक्षेच्या योजनांबाबत सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी,अल्पसंख्याक व वंचित घटकांसाठी स्वतंत्र व भरीव तरतुदी नसणे ही गंभीर बाब असल्याचे डॉ.नीरज वाघमारे यांनी सांगितले.शिक्षण,आरोग्य,पोषण आहार व सामाजिक न्यायाच्या योजना कमकुवत केल्याने गरिबांवरील अन्याय अधिकच वाढणार आहे.विदर्भासारख्या मागास भागातील शेती,पाणी व रोजगाराच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली.
हा अर्थसंकल्प कॉर्पोरेटधार्जिणा असून सामान्य जनतेसाठी नसल्याचे स्पष्ट झाले आहे,असे सांगत डॉ.नीरज वाघमारे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या अर्थसंकल्पाचा निषेध केला. बहुजन व वंचित समाजाच्या हक्कांसाठी रस्त्यावर आणि लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र केला जाईल,असा इशाराही त्यांनी दिला.

Related posts

संदीप ढाकुलकर यांची राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता . सचिव पदी निवड

bol maharashtra

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी:कृष्णा पुसनाके,शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

bol maharashtra

बाबा कंबलपोष दरगाह कमिटीचा उपक्रम देत आहे हजारो गरजूंना मायेची ऊब…!

bol maharashtra