Bol Maharashtra
Last 24 Hour ब्रेकिंग महाराष्ट्र राजकारण सामाजिक

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्राताईंनी केली भावूक पोस्ट,स्व.दादांची शिकवण हेच बळ..!

मुंबईत लोक भवन येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्रा ताई अजित पवार  यांनी एक फेसबुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये सुनेत्रा ताई म्हणतात…

आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.
दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन.
या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.”

Related posts

सीमा त्रिनयन कळमकर जिल्हा परिषदेच्या आखाड्यात. वाढता प्रतिसाद..!

bol maharashtra

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर येथे इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मेळावा आयोजित ..!

bol maharashtra

माऊली च्या माऊली चे दुःखद निधन..

bol maharashtra