Bol Maharashtra
Last 24 Hour सामाजिक

हजारोंच्या साक्षीने साश्रु नयनांनी स्व.वसंतराव शिंदे अनंतात विलीन…!

यवतमाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे यांचे वडील वसंतराव शिंदे सर यांचे वृद्धापकाळात निधन झाले मृत्यू समयी ते ८० वर्षा चे होते

आज त्यांच्या मूळ गावी पांगरी तालुका आर्णी येथे शेतात त्यांना भडाग्नी देण्यात आली. त्यांचे निवास स्थाना वरून अंत्ययात्रा त्यांचे शेतात नेण्यात आली त्यावेळी वाशिम लोकसभा खासदार संजय देशमुख माजी शिवसेना आमदार बाळासाहेब मुनगिनवार माजी आमदार ख्वाजा बेग  जिल्हा मद्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील,,जिल्हा संपर्क प्रमुख उबाठा राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख किशोर इंगळे,माजी आर्णी पंचायत समिती सभापती राजू विरखडे शेतकरी सेनेचे प्रमोद कुदळे,शेखर खंदार,अल्पजित गायकवाड, दत्ता हुलगुंडे, निखिल मस्के,अनंता मोरे,फैयाज शेख,अनिल गेडाम, विनोद पंचभाई,रउफ शेख,व विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, नातेवाईक आप्तेष्ट उपस्थित होते.

शेवटी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

बोल महाराष्ट्र च्या वतीने स्व.वसंतराव शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Related posts

महापालिका रणांगण निवडणुकी ची घोषणा ,मुंबई साठी सर्वांचाच रहाणार जोर…!

bol maharashtra

गोरक्षकांनी दिले ६२ गाईंना जीवदान,पोलिसांनी केली सुटका…!

bol maharashtra

आर्णीत इतिहास घडणार, भक्तांच्या गर्दी चा रेकॉर्ड होणार…!

bol maharashtra