Bol Maharashtra
धर्म - कर्म सामाजिक

गोरक्षकांनी दिले ६२ गाईंना जीवदान,पोलिसांनी केली सुटका…!

प्रतिनिधि संदिप ढाकुलकर
10/1/2026

 

आर्णी( अंजनखेड) येथे तब्बल 62 गायीची गोरक्षाकडून सुटका..!

आर्णी तालुक्यातील अंजनखेड येथे तब्बल 62 गाई रस्त्यावरून जात असताना ही बाब लोन बेहळ येथील गौरक्षकाच्या लक्षात आली असता सदर गौरक्षकांनी गाईंना नेणाऱ्या इसमास थांबवत विचारपूस केली असता सदर इसमांकडून उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गौरक्षकांनी तात्काळ आर्णी पोलिसांशी संपर्क करीत तात्काळ पोलिसांना घटनास्थळी बोलून सदर घटनेची माहिती दिली असता बीट जमादार संकुलावर साहेब आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर घटनेची चौकशी केली असता तब्बल 62 गाई अनधिकृत पने नेत असताना चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक कोणतीही माहिती मिळाली नाही
त्या मुळे गोरक्षकांनी आक्रमक पवित्रा घेत सदर गायांना शेंदूर सनी येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांच्या शेतात आसरा देऊन सर्व गाईंना चाऱ्याची सोय केली या वेळेस प्रहार संघटना मा. सरचिटणीस पुणे जिल्हा संदिप रामदास ढाकुलकर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश करनेवार, तेजस गरड, विलास गरड, किशोर गरड, प्रफुल भोयर, संतोष जाचक, आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
सदर गायी दिनांक 11/1/26 रोजी सुखरूप मूळ गावी पोलिस चौकशी नंतर सोडून सोडून देण्यात आले पुढील चौकशी आर्णी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहे

Related posts

आर्णीकरांना आता ‘बिबट्या’चे भय,तरुणावर झडप,सुदैवाने जीव वाचला..!

bol maharashtra

प्रजासत्ताक दिनी जिल्हा प्रशासनाला गुरुदेवने धरले धारेवर

bol maharashtra

नाम फाउंडेशनचा मायेचा हात; सिरेसायगावात गरजू महिला शेतकऱ्यांना बियाणे वाटप

bol maharashtra