Bol Maharashtra
खेळ मोठी बातमी सामाजिक

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशन मधून क्रिकेट चा थरार…ए.पी.ए.चे आयोजन…

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशन मधून क्रिकेट चा थरार…ए.पी.ए.चे आयोजन…

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा विषयक व कायदेशीर जनजागृती करिता ऑपरेशन प्रस्थान राबविण्यात येत आहे.
या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन शिक्षण क्रीडा,रोजगार व सामाजिक प्रबोधना चा त्यांचा प्रयत्न आहे.
या उपक्रमा अंतर्गत पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात व आर्णी चे कर्तव्यदक्ष ठाणेदार निलेश सुरडकर व आर्णी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पुढाकारात
आर्णी प्रीमियर लीग (ए.पी.एल.)क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.देऊरवाडा पुनर्वसन यवतमाळ रोड समोरील हेली पॅड ग्राउंड वर या सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी प्रथम बक्षीस १००००० रुपये नीताताई राजेश आडे अद्यक्ष गणपती संस्थान खेड यांच्या तर्फे तर द्वितीय बक्षीस ७१ हजार कोमल स्टोन क्रेशर व शेखर भाऊ खंदार तर तिसरे बक्षीस ५१००० रुपये संदीप लोळगे संदीप ज्वेलर यांच्या तर्फे दिले जाणार आहे
या सामन्यात सहभागी संघा साठी प्रवेश फी १००० रुपये असून सर्व टीम व खेळाडूस ड्रेस कोड बंधनकारक असणार आहे.
शिवाय वयक्तिक बक्षिसात सर्व सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूस १००००,उत्कृष्ट फलंदाज ५००० व उत्कृष्ट गोलंदाज ५००० रुपये रोख गोपाल ठाकरे ठाकरे मोबाईल यांच्या कडून देण्यात येणार आहे.
केवळ १६ संघात हा क्रिकेट चा थरार होईल फुल आर्म बॉलिंग व सामने अंतरराष्ट्रीय नियमाने खेळवले जाणार असून पंचाचा निर्णय अंतिम राहणार आहे.
खेळाचे सर्व नियम पाळून शिस्तीत सर्वांनी खेळायचे असून या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आर्णी शहर व तालुक्यातील युवक व क्रीडा प्रेमीनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आर्णी पोलीस स्टेशन चे ठाणेदार नीलेश सुरडकर व आर्णी पोलिसांनी केले आहे.
१६/२/२६ ते २२/२/२६ पर्यंत चालणाऱ्या या सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब वर अवादा कंपनी कडून केले जाणार आहे.

Related posts

भिमगीतांच्या कार्यक्रमासोबत वैचारिक मेजवानी ५ एप्रिल ला आर्णी तालुक्यातील केळझरा येथे आयोजन..!

bol maharashtra

तळणी येथे रमजान ईद आनंदात व उत्साहात साजरी

bol maharashtra

आर्णी नगरपरिषद कोणासही बहुमत नाही,युती शिवाय पर्याय नाही…!

bol maharashtra