Bol Maharashtra
सामाजिक

भिमगीतांच्या कार्यक्रमासोबत वैचारिक मेजवानी ५ एप्रिल ला आर्णी तालुक्यातील केळझरा येथे आयोजन..!

केळझरा येथे ५ एप्रिल रोजी ‘समता विचार परिषद’ व ‘भीम गीतांचा धमाका’ कार्यक्रमाचे आयोजन

आर्णी (प्रतिनिधी):
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे औचित्य साधून, जयभीम नगर केळझरा (ता. आर्णी, जि. यवतमाळ) येथे येत्या रविवार, ५ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘समता विचार परिषद’ व भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख वक्ते आणि प्रबोधन
सायंकाळी ६ वाजता आयोजित या परिषदेमध्ये प्रबोधनासाठी महाराष्ट्रातील नामवंत वक्ते उपस्थित राहणार आहेत. यात मुख्य मार्गदर्शक म्हणून परभणी येथील मा. विठ्ठल कांगणे सर आपले विचार मांडतील. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रसिद्ध वकील मा. अ‍ॅड. मुमताज जावेद शेख (दिल्ली) या देखील प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
सांस्कृतिक मेजवानी: भीम गीतांचा धमाका
विचार परिषदेनंतर रात्री ९ वाजता ‘भीम गीतांचा धमाल धमाका’ हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल. यामध्ये नागपूरचे सुप्रसिद्ध गायक सुरज अतिश आणि नांदेडच्या गायिका नालंदा सांगवीकर आपल्या सुमधुर आवाजात भीम गीते सादर करून महापुरुषांना मानवंदना देणार आहेत.
ठिकाण आणि वेळ
दिनांक: ५ एप्रिल २०२६, रविवार.
वेळ: सायंकाळी ६ वाजेपासून.
स्थळ: दिनबंधू खरताडे स्टेडियम, मोक्षधाम रोड, जयभीम नगर केळझरा, ता. आर्णी.
या कार्यक्रमाचे आयोजन जयभीम नगर केळझरा येथील नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी या ‘समता विचार परिषदे’ला व भीम गीतांच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts

कार्तिक ने मिळवले प्रेरणादायी यश,जिद्द ,संस्कार परिश्रम घेत बनला डॉक्टर…!

bol maharashtra

स्व.अजित दादांना आर्णीत श्रद्धांजली, परवेज बेग मित्र परिवारा कडून श्रद्धांजली सभेचे आयोजन..!

bol maharashtra

आर्णी च्या एन एम जी ग्रुप चा सामाजिक आदर्श,संदल च्या खर्चाचे पैसे दिले कॅन्सरग्रस्त रुग्णांस…!

bol maharashtra