Bol Maharashtra
सामाजिक

सुनील पोतगंटवार १६ वर्षा पासून करत आहेत जलसेवा,सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक..!

कु-हा (तळणी)- येथुन लगत असलेल्या तळणी फाटा येथे गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेली पाणपोई सेवा यंदाही उत्साहात सुरू करण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या कडाक्यात प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना दिलासा देणारी ही सेवा गावासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.तळणी या ठिकाणा वरुन अनेख गावासाठी ये जा करण्यासाठी तळणी चौफुली जावे लागते.गेल्या सोळा वर्षांपासून या चौफुलीवर पाणपाई सुरु आहे. सद्या उन्हाळा सुरु असून लग्न साराईची मोठी धाम धुम सुरु आहे,
घाटंजी ते आर्णी व यवतमाळ ते सदोबा सावळी ची तळणी ही
चौफुली असुन हे प्रवाशाचे केंद्र आहे . ह्या ठिकाणी ये – जा करणारे प्रवासी पाणी पीत आपली तहान भागवत आहे.वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मातीच्या माटातील थंड पाण्याची सोय उपलब्ध करून देत ही सेवा सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
गेल्या सोळा वर्षा पासून स्वं खर्चाने तळणी येथिल राष्ट्रवादी काँग्रेस आर्णी तालुकाध्यक्ष सुनिल पोतगंटवार हे पाणपोई , पक्षी पान पोळी व लग्नप्रसंगी मोफत टॅकर ने पाणी देत आहे .त्याच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिक त्यांचे कौतुक करत आहे.

Related posts

काँग्रेस शहराध्यक्षाला विजयाचा गुलाल पक्ष नेते सहकारी आनंदले…!

bol maharashtra

शिक्रापूर (पुणे) केंदूर येथे विधवा महिलां साठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन समाजात समोरअनोखा आदर्श..!

bol maharashtra

हळव्यामनाचा दिलदार नेता गेला:माजी आमदार ख्वाजा बेग

bol maharashtra