Bol Maharashtra
सामाजिक

मनं जिंकणारा अधिकारी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ..!

प्रशासन म्हटले की अधिकारी आला च तालुक्यातील ठिकाणी जनतेची कामे जलद गतीने व्हावे ही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा.

अधिकारी असो की कर्मचारी तो शासकीय सेवेत असला म्हणजे आपसूकच बदली आली च त्यातही तालुक्याचा अधिकारी म्हटलं की सेवाकाळ मर्यादित आलाच या कालावधीत काही अधिकारी सेवेच्या ठिकाणी आपल्या कर्तृत्व व कामाची छाप सोडतात.आर्णी तहसीलदार म्हणून रुजू होताच तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावाने राजकीय सामाजिक व पत्रकार मंडळी असो की नागरिक यांचे मन जिंकले.आपल्या सेवा काळात त्यांच्या केबिन ला त्यांना मिळण्यास कुठल्याही विशिष्ट परवानगी ची गरज असंत नाही.

काम घेऊन गेलेल्या माणसाला क्षणाचाही विलंब न लावता निर्णय व काम करून देण्यात वाहूरवाघ साहेबांचा हातखंडा आहे

प्रत्येक माणसाला सौजन्यपूर्व  वागणूक मिळाल्याने ते लोकाभिमुख ठरले आहेत.प्रशासकीय शिबिरातून लोकांना गतिमान सेवा देण्यात व सामाजिक कार्यात भरीव योगदान देऊन वाहूरवाघ हे लोकप्रिय ठरले.

आज तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांचा वाढदिवस आज त्यांच्या कार्यालयात जणू काही शुभेच्छा देणाऱ्या विविध स्तरातील लोकांची यात्रा भरली.होती जमा झालेले पुष्पगुच्छ  त्यांच्या वरील प्रेमाची पावती दिसून येते अधिकारी येतात व जातात पण जनतेच्या मनात घर करणारे मोजके असतात त्यात तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांचे नाव अग्रस्थानी आहे.

बोल महाराष्ट्र परिवारा कडून तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. !

Related posts

लाडक्या बहिणीं’चा संताप कामी आला, ८६ लाख महिलांच्या अडकलेल्या हप्त्यांचा मार्ग मोकळा. सौ. राधाबाई कामारकर यांच्या मागणीला यश

bol maharashtra

रेती अभावी जवळ्यात घरकुल रखडले…योजनेचा फायदा काय…?

bol maharashtra

माहेर संस्थेत महिला मेळावा उत्साहात संपन्न ..!

bol maharashtra