Bol Maharashtra
बिना केटेगरी

शिक्रापूर सरपंच गेले कुठे..?संपर्क क्षेत्राच्या बाहेर..!

 

प्रतिनिधि✒️ संदिप ढाकुलकर 15/1/26

शिक्रापूर येथिल सरपंच संपर्क क्षेत्राच्या बाहेर…!

शिक्रापूर (पुणे) सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे पडघम वाजले आहे याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ग्रामपंचायत हि एकूण सतरा सभासद असलेली ग्रामपंचायत आहे यातच ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करून सरपंच रमेश गडदे हे नॉट रिचेबल झाले आहे. त्या मुळे ग्रामस्थांमध्ये सध्या विविध चर्चेला उधाण आले आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतचे सरपंच पद हे मंगलदास बांदल यांच्या गटाकडे आहे. बहुमत हे माजी सरपंच बापू जकाते यांच्या कडे आहे त्या मुळे आत्तापर्यंत एकूण नव सदस्यांनी उपसरपंचपदाचा बहुमान मिळविला आहे. खात्रीलायक सूत्राच्या माहितीनुसार ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे आणि त्रिनयन कळमकर यांनी नाराजगी दाखवत विरोधी गटाशी जवळीक निर्माण केली आहे. त्या मुळे उपसरपंच पदाची माळ जर या दोन पैकी एका सदस्याच्या गळ्यात पडली तर याचा थेट परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर होणार आहे. त्या मुळे ही निवडणूक घेण्यासाठी एक गट आग्रही आहे तर दुसरा गट ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न करत आहे. उपसरपंचपदाची निवडणूक जाहीर करून सरपंच रमेश गडदे हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.

Related posts

करंजी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची मुजोरी आणि ‘पठाणी’ वसुली; मनसेचा ‘खळ्ळ-खट्याक’चा इशारा!

bol maharashtra

जनमताचा सन्मान,नेतृत्वाचा आदेश व आर्णी च्या विकासासाठी महायुती:राजुदास जाधव..

bol maharashtra

पांढरकवडा विकासासाठी जय विरु ची जोडी विजयाचा शोले करतील:ना.एकनाथ शिंदे

bol maharashtra