Bol Maharashtra
बिना केटेगरी

जनमताचा सन्मान,नेतृत्वाचा आदेश व आर्णी च्या विकासासाठी महायुती:राजुदास जाधव..

जनमताचा आदर व पक्ष नेतृत्वाच्या आदेशाने आर्णी नगरपरिषद मध्ये महायुती:राजुदास जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख
गेल्या काही दिवस चाललेल्या आर्णी नगरपरिषद सत्ता स्थापणे च्या विषयावर आज सायंकाळी ५ वाजता अखेर पडदा पडला
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना भारतीय जनता पक्षाने एकत्र येत महायुती चा निर्णय घेतला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहा वर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख राजुदास जाधव यांनी अधिकृत घोषणा केली.
आर्णी च्या जनतेनी नगरादयक्ष जरी काँग्रेस चा दिला असला तरी शिवसेना उमेदवार दुसऱ्या स्थानी होता. नगरपरिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ८ नग्रेसवक तर महा युतीतील शिवसेनेचे ४ नगरसेवक निवडून आले. व भारतीय जनता पक्षाचे १ नगरसेवक विजयी झाले
अर्थात महा युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या. म्हणून जनमताचा आदर व विकास हे सूत्र ठेवत आम्ही महा युती चा निर्णय घेतला असे यावेळी राजुदास जाधव म्हणाले.
पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड स्थानिक आमदार राजू भाऊ तोडसाम राष्ट्रवादी काँग्रेसचे ना.इंद्रनील नाईक साहेब व पक्ष श्रेष्ठी चा आदेश व राष्ट्रवादी काँग्रेस ने संख्याबळ जास्त असतांना देखील शिवसेनेला उप नगरादयक्ष पद सोडलं
यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साजिद बेग यांचे राजुदास जाधव यांनी आभार व्यक्त केले.
महा युती ची घोषणा करत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साजिद बेग यांनी शिवसेना नेते संजय भाऊ राठोड,ना.इंद्रनील भाऊ नाईक यांच्या माध्यमातून आर्णी शहराच्या विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलो यात काँग्रेस ला देखील सकारात्मक विकासात आम्ही साथ देऊ असेही साजिद बेग म्हणाले.
पक्ष वेगळे असले तरी सर्वाना विश्वासात घेऊन वाटचाल करू आणि इतर पदाचे वाटप सर्वांशी चर्चा करून करण्यात येईल असेही ते म्हणाले.
महा युतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले मात्र आम्ही एकमेकांवर निवडणुकीत टीका केली नाही
भविष्यात कुठेही मतभेद निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असेही साजिद बेग यावेळी म्हणाले.

आजच्या तातडीच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साजिद बेग ,यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख राजुदास जाधव
शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ.विष्णू उकंडे,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पोतगंटवार, राष्ट्रवादी शहर अद्यक्ष रामेश्वर चौधरी, शिवसेना शेतकरी सेनेचे विदर्भ समनवयक प्रमोद कुदळे, शिवसेना आर्णी शहर प्रमुख सुरेश पवार, भाजप चे डॉक्टर सेल चे डॉ.श्याम सुंदर गुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेश मोरलेवार,जिल्हा यवतमाळ जिल्हा पोलीस पाटील संघटना माजी अध्यक्ष विलास पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत पाटील गावंडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिगंबर बुटले,भारतीय जनता पक्ष विमुक्त जाती आघाडी जिल्हा अद्यक्ष बिपीन राठोड,भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र राठोड,भाजप चे माजी शहराध्यक्ष विशाल देशमुख,शिवसेना युवा सेनेचे विधानसभा प्रमुख अभिलाष इंगोले,आर्णी विधानसभा प्रमुख जाकीर सोलंकी,राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक संजय व्यवहारे,मोईबशेख, राष्ट्रवादी चे श्याम ठाकरे,सादिक शेख,माजी ग्रामपंचायत सदस्य शरीफ शेख, शिवसेनेचे रघुनाथ मुंडवाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे युनूस शेख,निलेश बुटले,निलेश गावंडे,बंटी जाधव, भाजप चे प्रमोद आडे,यांच्या सह शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आर्णीकर जनतेने गेली २७ वर्ष माझ्यावर विश्वास टाकला
महायुतीच्या पत्रकार परिषद मध्ये साजिद बेग म्हणाले की ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना पासून कधी माजीमंत्री शिवाजीराव मोघे माजी आमदार ख्वाजा बेग माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांच्या सोबत मला कायम सत्तेत ठेवले असे म्हणत साजिद बेग यांनी आर्णीकर जनतेचे आभार मानले.

 

महा युतीसाठी तिघांनी घेतली महत्वाची भूमिका
महा युती घडून यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग,युवा उद्योजक गोपाल कोठारी,शेखर खंदार यांनी देखील महत्वाची भूमिका घेतली.

Related posts

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

आरोग्य सेवे चे कार्य प्रशंसनिय:माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस च्या आरोग्य सेवेला उस्फुर्त प्रतिसाद..!

bol maharashtra

रविवारी त्रैमासिक मुक्तमंथनचा वाचक,लेखक मेळावा

bol maharashtra