Bol Maharashtra
सामाजिक

पाण्याचे महत्व जाणून एकोप्याने परसोडा ग्रामपंचायत ने बांधला ‘वनराई’ बंधारा…!

पाण्याचे महत्व जाणून भु गर्भात पाणी जिरवण्यासाठी परसोडा ग्रामपंचायत च्या नागरिकांनी एकत्र येत श्रमदानातून वनराई बंधारा निर्माण केला.

आर्णी :मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत परसोडा ग्रामपंचायत व विकास गंगा सामाजिक संस्था, रिलायन्स फाऊंडेशन द्वारा सामूहिक श्रमदानातून गावालगतचे ओढ्यावर वनराई बंधारा निर्माण करण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत सामूहिक श्रमदानाचे उद्देशाने गावातील लोकांन मध्ये एकोपा निर्माण करून पाण्याचे महत्व जाणून परसोडा ग्रामपंचायत ने सामूहिक श्रमदाणातून गावालगतचे ओढ्यावर वनराई बंधारा निर्माण करण्यात आला ह्यावेळी तालुका कृषी अधिकारी आनंद बदकल, सहाय्यक कृषी अधिकारी अविनाश आढाव, बळवंते, विकास गंगा संस्थेचे वैभव गायकी, प्रदिप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती तर ह्यावेळी सरपंच प्रा सौं स्वप्ना अतुल देशमुख, माजी सरपंच अतुल पाटील देशमुख,अमोल देशमुख, दत्ता हुलगुंडे, शंकर कोल्हे, गजानन शेळके,ज्ञानेश्वर मिसाळ,कैलास जाधव, स्वप्नील राठोड, सुनिल राठोड, गोपाल जाधव, उत्तम जाधव,दामू तुवर,ज्ञानेश्वर गुडे, जितेश तुवर,मंगेश सोळंके,किशोर पवार, रोहिदास तुवर, राहुल तुवर यांनी परिश्रम घेऊन सामूहिक वनराई बंधारा निर्मिती केली.

Related posts

सामाजिक संवेदना जपत मुलाचा वाढदिवसाला वृद्धाश्रमात दिले भोजन…!

bol maharashtra

निवडणुकीची ‘ओवाळणी’ संपली, लाखो बहिणींच्या ओवाळणीला केवायसीचे ग्रहण.

bol maharashtra

परसोडा ग्राम पंचायत द्वारा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

bol maharashtra