Bol Maharashtra
Last 24 Hour बिना केटेगरी महाराष्ट्र मोठी बातमी राजकारण

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

नाशिक मशे पदाचा दुरुपयोग करून सदनिका घेतल्याचा आरोप सिद्ध होऊन नाशिक प्रथमश्रेणी न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा ठोठावली होती त्यावेळी माणिकराव यांची आमदारकी जाईल की काय अशी श्यक्यता होती मात्र तेव्हा त्यांच्या कंदील कृषी खात्या वरून वारे गेले. सतत वादग्रस्त वक्तव्य व सभागृहात रमी खेळण्याच्या त्यांच्या व्हिडीओ ने ते अडचणीत आले होते.
तेव्हा त्यांच्या कडे कृषी खाते काढून ते दत्ता भरणे datta mama bharane यांना देण्यात आले होते.
आपणास सदनिका प्रकरणात व सभागृहात रमी प्रकरणात गोवण्यात आल्याचा कांगावा त्यांनी केला होता.
त्यांनी दिवाणी न्यायालयाच्या निर्णया विरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केली होती. अपील केल्याने त्यांची आमदारकी व मंत्री पद टिकले होते.मात्र आता उच्च न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे

मु : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यापल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadvnis यांच्या पत्राचा संदर्भ देत खातेबदल पत्रावर मंजुरी दिली आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकीय वर्तुळातील ही सर्वात मोठी बातमी असून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी असणार आहे. माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांकडे आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर, सर्व घडामोडी वेगाने घडल्या आहेत.

सदनिका घोटाळाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे आज सकाळीच मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, अजित पवारांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. नाशिक सत्र न्यायालयाने काल (मंगळवारी, ता १६) सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यामुळं माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. विरोधी पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते. कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.

माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद काढून घेतलं आहे. माणिकराव कोकाटेंची खाती अजित पवारांकडे वर्ग करण्यात आल्याने ते आता बिन खात्याचे मंत्री बनले आहेत. क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग ही खाती अजित पवारांकडे सोपवली गेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र दिल्यानंतर राज्यपालांकडूनही त्यास मंजुरी देण्यात आली.

Related posts

सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, खातेही मिळाले…!

bol maharashtra

‘अनाथांचा नाथ एकनाथ’ याची प्रचिती संकटात असणाऱ्या राज्यातील लोकांना आला: पराग पिंगळे

bol maharashtra

इजनी च्या मुख्याध्यापकाने केला भंगारावर हाथ साफ,पवन पाचकोरे यांनी केली तक्रार…!

bol maharashtra