Bol Maharashtra
गुन्हा

शिक्रापूर(पुणे): शिक्रापुरात चोरांचा सुळसुळाट घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास…!

प्रतिनिधि/ संदीप ढाकुलकर 17/12/25

शिक्रापूर(पुणे): शिक्रापुरात चोरांचा सुळसुळाट घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास…!

शिक्रापूर येथील प्रशांत शिर्के हे घरातील वरच्या मजल्यावर कुटुंबासहित झोपी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत रोख रक्कम व दागिने लंपास केले, सदर घटना ही शिक्रापूर परिसरात कुंभारवाडा येथे घडली आज्ञा चोरट्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत शिर्के हे सकाळच्या वेळी झोपेतून खाली आल्यानंतर दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर बाब लक्षात येताच शिर्के यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे जात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सदरची घटनाही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. चोरीच्या वाढत्या घटना थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने पोलीस मित्र आणि ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे

Related posts

एकट्या रुपाली चाकनकरच का सर्वांची चौकशी व राजीनामा झाला पाहिजे: रेवननाथ गायकवाड.

bol maharashtra

तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

bol maharashtra

अखिल भारतीय उद्योग व्यापार मंडल सिद्धार्थनगर ने किया पुलिस का सम्मान ,अंगवस्त्र मय पुष्प गुच्छ किया भेंट

Web1Tech