Bol Maharashtra
साहित्य

राजेंच्या भूमीत बिब्बाकार गरजला,’आमची जिंदगी लाकूडफाटा’कवितेतून विजय ढाले यांचा व्यवस्थेवर प्रहार…!

आर्णी चे नामवंत विख्यात वऱ्हाडी कवी गीत व गझल कार शेतकरी विद्रोही साहित्यिक यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी चे भूषण बिब्बाकार विजय ढाले यांनी त्याच्या अप्रतिम रचनेतून ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उपस्थित हजारो सारस्वत व रसिकांचे मन जिंकले.

विषमतेच्या दरी वर बिब्ब्याचा परखड काव्य प्रहार

 

आर्णी, ता. १० स्वराज्याची राजधानी सातारा येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा-शाहापुरी आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे शेतकरी साहित्यीक विजय ढाले यांनी समाजाच्या विषमतेवर व्यवस्थेवर प्रहार करीत आपली काव्य रचना सादर करून उपस्थितांची वाहवा घेत दाद मिळवित समाजाला आरसा दाखवित रसिक श्रोत्यांची दाद मिळविली.

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनात विजय ढाले यांनी समाजातील वाढतचाललेल्या विषमतेच्या दरीवर आपली कवीता सादर करीत समाजाला जागरूक करन्याचे काम केले.

महाराष्ट्रातून व इतरही राज्यातून अनेक नामवंत कवी या संमेलनात आपली उपस्थिती दर्शविली यवतमाळ

केसन पवार । निरूपमा महाजन । मा मास दौंड । शिवाजी जोगदंड । गोपाल र। मंदाकिनी पाटील । सुजाता पना गुरुव । राकेश शेटे । संगीत षा खरग

जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत विजय ढाले यांनी साहित्य संमेलनात आपली उपस्थिती दर्शवत अत्यंत प्रेरनादाई कवीता सादर केली.

आपल्या सादरीकरनाच्या वेगळ्या शैलीसाठी संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कवी विजय ढाले यांनी सादर केलेली रचना अक्षरशः रसिक श्रोत्यांच्या मनाला चटका लावून गेली.

डेकर  नामदेव वाबळे

। मधुकर जाधव  अनु कास खरे  दीपाली दा ली कुलकर्णी । शरद श्री पाटील

सूअस्विलं भारतीय मराठी साहित्य संमेलन

अश्रुंचा अश्रृंशी संवाद झाला पाहिजे

मौन शब्दांचाही अनुवाद झाला पाहिजे

व्यवस्थेने लिहिला पाहिजे शब्दकोष करुनेचा

मी गाईल त्या गिताचा ब्रम्हनाद झाला पाहिजे

तूमच्या नशिबी टाटा बाटा आमची जिंदगी लाकुड फाटा

तूमच्या गळी फुल हार तुरे पायी रूतते आमच्या काटा आमची जिंदगी लाकुड फाटा गाव कुसास शहर भुलले हायवेला मग भुलला फाटा ज्या शहराशी जोडले नाते त्या शरीराचा झाला साटा आमची जिंदगी लाकुड फाटा बालपन जवा चिल्लर होते

खुर्दाही मग वाटे नोटा तारुण्य जेव्हा झालं एटीएम आयुष्यात मग झाला तोटा आमची जिंदगी लाकुड फाटा भाऊ भावाचा झाला वैरी भावाने मग काढला काटा भिंतीला का मग दोश देता भावकीचा जर झाला वाटा आमची जिंदगी लाकुड फाटा सहज होते जीवन सगळे बाप जर तु होशील बेटा कर दोन हात आयुष्याशी सरळ मृत्यूशी घेना खेटा आमची जिंदगी लाकुड फाटा या कवितेच्या माध्यवातून त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले.

श्रीकांत देशमुख व अखिल भारतीय महामंडळाच्या कार्यवाह सुनिता राजे पवार यांचे हस्ते शेतकरी साहित्यीक कवी विजय ढाले यांचा शाल व जानता राजा शिव छत्रपती शिवाजी राजे यांची पुर्णाकृती शिल्प देऊन सन्मान करून सत्कार करन्यात आला.

या यवतमाळ जिल्ह्यातील साहित्यीक सुपुत्राचे सर्व क्षेत्रातून कौतूक करन्यात येत आहे.

Related posts

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय साहित्य भेट…..

bol maharashtra

डिजिटल युगात वाचन संस्कृतीचा विस्तार आवश्यक

bol maharashtra

भाग्यनगर साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिवस उत्साहात; डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वाटचाल आवश्यक – गजानन बिडकर 

bol maharashtra