Bol Maharashtra
बिना केटेगरी

रविवारी त्रैमासिक मुक्तमंथनचा वाचक,लेखक मेळावा

 

रविवारी त्रैमासिक मुक्तमंथनचा वाचक,लेखक मेळावा

पुरस्कार वितरण आणि भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी

प्रतिनिधी ( अमरावती)

स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भिमटेकडी अमरावती येथे त्रैमासिक मुक्तमंथनचा वाचक, लेखक मेळावा रविवार १८ जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या वाचक लेखक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. सविता कांबळे या राहणार असून मेळाव्याचे उद्घाटन डॉ. नितीन कोळी हे करणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून इंजि. विलास साखरे तर प्रमुख अतिथी म्हणून गौतम ताराराम, राजस्थान आणि प्रशांत वंजारे उपस्थित राहणार आहे. आयोजनाची भूमिका डॉ. चंद्रकांत सरदार मांडणार आहेत.

ज्येष्ठ गझलकार प्रमोद वाळके ‘युगंधर’ आणि जेष्ठ चित्रकार बळी खैरे यांना याच कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चार सत्रात संपन्न होऊ घातलेल्या या कार्यक्रमात प्रा. माधवराव सरकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय संविधानावरील हल्ले आणि आंबेडकरी विचारवंतांची भूमिका’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून तिसऱ्या सत्रात नारायण जाधव येळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी यात सहभागी होतील. डॉ. भी. र. वाघमारे, डॉ. पुष्पाताई थोरात, डॉ. वामन गवई, डॉ. सिमा मेश्राम , कुंदाताई सोनुले, डॉ. भास्कर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे.

मेळाव्याला उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन संपादक सुनंदा
बोदिले, विद्या पाटील, वंदना धवने, डॉ. खुशाल ढवळे, अतुल कुमार गवई , हेमंत सावळे आदींनी केले आहे.

Related posts

जनमताचा सन्मान,नेतृत्वाचा आदेश व आर्णी च्या विकासासाठी महायुती:राजुदास जाधव..

bol maharashtra

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

आता तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची होणार चौकशी..? फासे उलटे फिरले दलाला मार्फत चे पितळ पडले उघडे..!

bol maharashtra