Bol Maharashtra
बिना केटेगरी राजकारण सामाजिक

आरोग्य सेवे चे कार्य प्रशंसनिय:माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस च्या आरोग्य सेवेला उस्फुर्त प्रतिसाद..!

नागरिकांच्या  मूलभूत सुविधा देण्याची सेवा करत असतांना आरोग्यासाठी देखील सेवा देणे ही बाब कौतुकास्पद आहे आर्णीत नगर परिषद पदाधिकारी यांनी आयोजित केले आरोग्य शिबीर प्रशंसनिय आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी केले.

आर्णी नगरपरिषद वार्ड क्रमांक ९-१०-११ च्या नागरिकाच्या आरोग्य सेवेसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

 : स्थानिक नगर परिषद शाळा क्र. १ येथे डॉ नाहिद आरीज बेग नगरसेवक न.प. आर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शुगर (मधुमेह), बि.पी., संपूर्ण रक्त तपासणी, बि.एम.आय., सिकलसेल, कुष्ठरोग तपासणी तसेच सामान्य आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबिर पार पडले. आर्नी शहरातील प्रभाग क्रमांक ८,९ व १० या प्रभागातील नागरिकांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या या शिबिराला माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आरीज बेग मिर्झा (उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस), नगराध्यक्ष नालंदा भरणे, अनिल आडे (सभापती कृ.ऊ.बा.स.) हे प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिराकरिता सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. सुनील गुप्ता नागपूर यांची टीम, आर्णी ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांची टीम व आशा वर्कर सज्ज होते. डॉ फैजान खान व डॉ निलोफर खान यांनी रुग्ण तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्याकरिता काँग्रेस गटनेता अमोल मांगुळकर, नगरसेवक निताताई ठाकरे, रियाज सय्यद, शफी मलनस, अश्विनी संजय राऊत, यास्मिन रहेमान शाह, प्रीती योगेश शिवरामवार, भावना जयराज मुनेश्वर इत्यादींनी परिश्रम घेतले. शिबिराला राजूभाऊ बुटले, माधवराव जाधव, डॉ. श्याम गुटे, शिवरामवार सर, सागर घोडेराव, गफूर शाह, मकबूल शाह, खुशाल ठाकरे, संजय राऊत, गजानन राठोड, गणेश चिल्लरवार सर, विनोद माहेश्वरी, अमित पवार, गीताताई सनसेटवार, गिरिधर कुबडे, प्रसेनजीत खंडारे, ख्वाजा शेख लाल, दिपक देवतळे, तन्मय बागुल ह्यांनी भेट दिली.

*४५३ लाभार्थ्यांची यशस्वी तपासणी. सहकार्य करणाऱ्यांचे आभार- डॉ नाहिद आरीज बेग*

डॉ. सुनील गुप्ता नागपूर, डॉ. रमा बाजोरिया(वैद्यकीय अधीक्षक, ग्रा.रुग्णालय), डॉ. आरती नाटकर मॅडम (टी.एच.ओ.), डॉ. सुनील भवरे, डॉ राम पद्मावार यांनी मोलाचे सहकार्य केल्याने हे शिबिर यशस्वी झाले. न.प. शाळेचे शिक्षक, न.प. कर्मचारी, हाफीज बेग उर्दू शाळेचा स्टाफ, आशा वर्कर व वैद्यकीय कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या परिश्रमाने शिबिरात तब्बल ४५३ नागरिकांची सर्व प्रकारची तपासणी करून मोफत औषध वितरण होऊ शकले. सर्वांचे आभार मानत या प्रकारचे शिबिर शहराच्या इतर भागातही लवकरच आयोजीत करण्याचा मानस डॉ नाहीद बेग यांनी व्यक्त केला.

Related posts

वाढीव गृहकरामुळे जनतेत तीव्र असंतोष शेकडो तक्रारी दाखल; 29 डिसेंबरला सुनावणी

bol maharashtra

पद नसतांना जनसेवेत तत्पर असणारा जनतेच्या मनातील नगरसेवक…!

bol maharashtra

अद्विता-अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड आर्णी ची ग्राहक व गुंतवणूकदारांसाठी आकर्षक व्याज दर योजना…!

bol maharashtra