Bol Maharashtra
सामाजिक

दिन दुबळ्या च्या सेवेत च खरा देव:रामराव पाटील राऊत..!

देव दगडात नसून तो माणसाच्या हृदयात आणि दीनदुबळ्याच्या सेवेमध्ये आहे असे प्रतिपादन मध्यवर्ती व शिखर बॅंकेचे माजी संचालक
:रामराव राऊत पाटील यांनी केले.
चंदन राठोड यांनी राबविलेला उपक्रम स्तुत्य
453 नेत्र रुग्णांनी घेतला लाभ
आर्णी : मानव जीवनात जन्माला आल्यावर काही तरी चांगले कार्य आपल्या हातून घडले पाहिजे आपण मंदिरात जाऊन दगडात देव पाहतो दगडाची पूजा करतो परंतु संत आणि गीतेत हेच सांगितलेले आहे देव दगडात नाही ! देव माणसात पहा रे ! देव दिन- दुबळ्यात… आंधळ्या पांगळ्यात पहा रे!आज खरोखर हाच उपदेश डोळ्यासमोर ठेवून चंदन राठोड याने देव दगडात नसून देव माणसाच्या हृदयात,दिन – दुबळ्यात आणि आंधळ्या पांगळ्याच्या सेवेतच देव असल्याचे मत शिखर बँकेचे माजी अध्यक्ष रामराव राऊत पाटील यांनी व्यक्त केले ते स्व. वामनराव गावंडे, स्व. रामदासजी बंडे, स्व. प्रयागबाई बंडे, स्व,सीमाबाई राऊत, स्व. सावित्रीबाई जाधव यांच्या स्मृतिपित्यर्थ ग्रामपंचायत कार्यालय यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज संयुक्त विद्यमाने लोणबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित केलेल्या भव्य मोफत डोळे निदान व मोतीबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिरात बोलत होते. आयोजित शिबिरात 453 नेत्र रुग्णांनी
तपासणीचा लाभ घेतले असून 37 नेत्र रुग्णाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली. ते पुढे म्हणाले की खरोखर 23 वर्षापासून निरंतर जनसेवा समाज उपयोगी कार्य आयोजक चंदन राठोड, चंद्रकांत बंडे, प्रकाश बुटले व राजू इंगोले यांच्या हातून होत असून या उत्कृष्ट उपक्रमातून मानवाच्या रुपात ईश्वरचीच सेवा होताना दिसत आहे. या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून स्व. वामनरावजी गावंडे, स्व. रामदासजी बंडे, स्व. प्रयागबाई बंडे, स्व. सीमाबाई राऊत आणि सावित्रीबाई जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मोनिकताई राठोड, रामराव राऊत, ज्येष्ठ समाज सेवक प्रल्हादराव इंगळे, माजी जी.प. सदस्य आनंता गावंडे, माजी पं. स. सभापती जीवन जाधव, अंजली ड्रेसेसचे संचालक राजेश श्रीवास, विलास राऊत, से.नि.अधिकारी अलकनंदा काळे, शांतीलाल जयस्वाल, ग्राम विकास अधिकारी प्रकाश वाघमारे, डॉ, प्रतीक वाघमोडे यांच्या शुभहस्ते , चंदन राठोड , चंद्रकांत बंडे , राजू इंगोले प्रकाश बुटले ,सुनील राठोड, शरद तिवारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रशासक मोनिका ताई सुनील राठोड हे होत्या. या नेत्र शिबिरात नेत्र चिकित्सा अधिकारी अरुण शिंदे व प्रज्ञा खैरे यांनी नेत्र तपासणी करून मोफत औषध देण्यात आले. या वेळी यवतमाळ येथील यश ऑप्टिकलचे संचालक राजू पारसेवार यांचे मार्फत अल्प दरात चष्मे देण्यात आले. या शिबिरात रूग्णा करिता जेवणाची, चहा व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबाराव गावंडे, रवी ढाकुलकर, किस्मत राठोड, ईश्वर पत्रे, करमसिंग राठोड, जेडी भगत, किशोर नीलगरवार, प्रद्युम्न राठोड , गणेश गावंडे,शुभम राठोड ,नितीन आडे, शेषराव राठोड, प्रवीण काळे, रोहिदास रामसिंग राठोड यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बूटले यांनी केले असून कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक चंदन राठोड यांनी केली तर आभार प्रदर्शन चंद्रकांत बंडे यांनी मानले.               

Related posts

वर्षाताई वसंतराव शिंदे बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध…!

bol maharashtra

अद्विता बँकेने जपली सामाजिक बांधिलकी, जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रातील महिलांचा केला सत्कार,नारी शक्ती चा जागर…!

bol maharashtra

नगरसेवक अशपाक शेख,राष्ट्रवादी चे पदाधिकारी अलीम देशमुख यांचा वाढदिवस साजरा,ग्रामीण रुग्णालयात केले फळ वाटप..!

bol maharashtra