Bol Maharashtra
बिना केटेगरी

जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालणा देणार :ना. संजय राठोड

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकासाला चालना मिळावी म्हणुन पालकमंत्री व मृदु व जलसंधारण मंत्री ना. संजय भाऊ राठोड यांनी  आढावा बैठक घेतली व प्रशासनास निर्देश देत कामास गती देण्याच्या सूचना केल्या.

ग्रामीण विकास आणि औद्योगिक प्रगतीला गती देण्याच्या उद्देशाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक आढावा बैठक घेण्यात आली.

मनरेगा अंतर्गत मंजूर ९,५०५ कामांचा सखोल आढावा घेत रोजगारनिर्मितीला चालना देणे, प्रलंबित कामांना वेग देणे तसेच कामांची गुणवत्तापूर्ण व वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तसेच MIDC अंतर्गत पांढरकवडा औद्योगिक क्षेत्रासह मौजा वटफळी, ता. नेर येथील प्रगतीचा आढावा घेत स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती वाढवणे आणि आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करण्यावर विशेष भर देण्यात आला.

या बैठकीस आमदार किसन वानखेडे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

रविवारी त्रैमासिक मुक्तमंथनचा वाचक,लेखक मेळावा

bol maharashtra

परसोडा येथील मोक्षभूमी झाली पर्यटनभूमी…!

bol maharashtra

विकासाची तळमळ असणारे नेतृत्व म्हणजे अजित दादा;आमदार प्रा.राजू तोडसाम

bol maharashtra