Bol Maharashtra
बिना केटेगरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ जिल्ह्यात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ जिल्ह्यात…!
माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे हे नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी व पांढरकवडा येथे नगरपरिषद प्रचार सभा घेण्यासाठी येत आहेत
वणी येथे माजी आमदार विश्वास नांदेकर व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम विदर्भ शिवसेना समनव्ययक पराग भाऊ पिंगळे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर भाऊ लिंगणवार,जिल्हा प्रमुख राजुदासजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश घेतला म्हणून येथे शिवसेनेला सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे तर या ठिकाणी न.प.मध्येसत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सोबत मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेची लढत होईल.
तर पांढरकवडा येथे सलीम खेतानी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सत्ताधारी नगरपरिषद ही यावेळी शिवसेने कडून लढत आहे
येथे शिवसेना पक्षाची (सलीम खेतानी) लढत भाजप व पारंपरिक विरोधक काँग्रेस पक्षाची लढत असून येथे नेतृत्व करणाऱ्या सलीम खेतानी यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे त्या ठिकाणी विजय निश्चित मानल्या जातो.

Related posts

करंजी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची मुजोरी आणि ‘पठाणी’ वसुली; मनसेचा ‘खळ्ळ-खट्याक’चा इशारा!

bol maharashtra

निष्ठावंत युवा शिपायास उमेदवारी देण्याची मागणी…!

bol maharashtra

विविध उपक्रमांनी साजरा केला जानी सोलंकी यांचा वाढदिवस,पत्रकार व मित्र मंडळाने उत्साहात वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा…!

bol maharashtra