Bol Maharashtra
बिना केटेगरी

योग्य उपचारांचे फलित : रुग्णाकडून देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा सन्मान

 

समाधानकारक उपचारांचे फलित : रुग्णाकडून देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा सन्मान

देगलूर प्रतिनिधी, दि. १२ :—
देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दर आठवड्याला आयोजित करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया शिबिरांमध्ये रुग्णांना समाधानकारक शस्त्रक्रिया व दर्जेदार उपचार मिळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पिंपळगाव येथील रुग्ण श्री. रमेश कुलकर्णी यांनी या समाधानकारक उपचारांचा अनुभव घेत आज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर व डॉ. थडके यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार केला.
शस्त्रक्रिया व उपचार काळात रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य निष्ठेने व जबाबदारीने पार पाडत उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल श्री. कुलकर्णी यांनी वैयक्तिकरित्या डॉक्टरांचा सन्मान करून आभार व्यक्त केले. शासकीय रुग्णालयांबाबत अनेकदा असमाधान व्यक्त केले जाते; मात्र देगलूर उपजिल्हा रुग्णालयात मिळणाऱ्या सेवेमुळे आज रुग्ण स्वतःहून डॉक्टरांचा सन्मान करत असल्याचे हे दृश्य कौतुकास्पद ठरत आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांनी कुठलीही खासगी प्रॅक्टिस न करता आपला संपूर्ण वेळ रुग्णालयाच्या कामकाजासाठी देत रुग्णांना उत्तम उपचार कसे मिळतील यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. थडके तसेच संपूर्ण वैद्यकीय, परिचारिका व आरोग्य कर्मचारी संघाने समन्वयाने कार्य करत रुग्णसेवेला प्राधान्य दिले असून त्याचेच हे सकारात्मक फलित असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
देगलूर उपजिल्हा रुग्णालयाने उभा केलेला हा आदर्श इतर शासकीय रुग्णालयांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related posts

संदीप ढाकुलकर यांची राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता . सचिव पदी निवड

bol maharashtra

निष्ठावंत युवा शिपायास उमेदवारी देण्याची मागणी…!

bol maharashtra

यवतमाळ-आर्णी-माहूर-किनवट रेल्वे मार्गाच्या मागणीला प्रचंड जनसमर्थन

bol maharashtra