Bol Maharashtra
निवडणूक

आर्णी नगरपरिषद सभागृहात डॉक्टर इंजिनिअर स्वीकृत…!

आर्णी नगरपरिषद सभागृहात आज स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व आर्णी चे माजी नगरादयक्ष अरीज बेग यांच्या पत्नी डॉ.नाहीद अरीज बेग यांची निवड करण्यात आली तर काँग्रेस पक्षा कडून आर्णी च्या राजकारणातील किंग मेकर अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साजिद बेग यांची निवड करण्यात आली साजिद बेग यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे एकट्याने नेतृत्व केले होते.

अभियंता असलेल्या साजिद बेग यांना सामाजिक कार्याचा वारसा त्यांचे वडील स्व.हापिज बेग यांच्या कडूनच मिळाला आहे त्यांचे नियोजन व विकासाचे धोरण व सर्वाना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आर्णी शहराच्या विकासाला नक्कीच उपयोगी पडेल.

अरीज बेग यांच्या पत्नी  नाहीद बेग ह्या डॉक्टर आहेत त्यांच्याही वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग शहराला होईल त्यामुळे आता डॉक्टर व इंजिनिअर हे तज्ञ सभागृहात सदस्य म्हणून गेलेले आहे.

Related posts

जाग्यावर सोडवला प्रश्न,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्परता…!

bol maharashtra

आर्णीत काँग्रेसचे नालंदा भरणे नगरादयक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ची मुसंडी,शिवसेना ४ तर शिवसेना उबाठा १ व भाजप ने खाते खोलले…!

bol maharashtra

आर्णी नगरपरिषद कोणासही बहुमत नाही,युती शिवाय पर्याय नाही…!

bol maharashtra