Bol Maharashtra
Last 24 Hour निवडणूक ब्रेकिंग मोठी बातमी राजकारण

आर्णीत काँग्रेसचे नालंदा भरणे नगरादयक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ची मुसंडी,शिवसेना ४ तर शिवसेना उबाठा १ व भाजप ने खाते खोलले…!

आर्णी नगरपरिषद चू निवडणूक मोठी रंजक ठरली.अनुसूचित जाती साठी आरक्षित नगरादयक्ष पद होते त्यासाठी १२ उमेदवार रिंगणात होते तर ११ वार्डात नगरसेवक पदाची निवडणूक पार पडली.
निवडणुकी दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही तर आज मतमोजणी देखील तहसिल कार्यालयात शांततेत पार पडली.
अपेक्षे प्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना शिंदे गटात लढत झाली यात काँग्रेस चे नालंदा भरणे हे विजयी झाले. कुणाल मनवर शिवसेना एकनाथ शिंदे हे दुसऱ्या क्रमांकावर तर भाजप चे राजू वाडेकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
निकल घोषित होताच विजयी उमेदवारांनी वाजत गाजत जल्लोष केला.
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व प्रदेश उपदयक्ष अरीज बेग यांनी केले तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषदेचे आमदार ख्वाजा बेग याची मोलाची साथ लाभली.त्याचे नगरादयक्ष विजयी झाले तर ८ ठिकाणी नगरसेवक विजयी झाले
तर दुसरी कडे किंग मेकर ठरलेल्या साजिद बेग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला व राज्य सरचिटणीस पद मिळवले त्याच्या एकट्याच्या नेतृत्वात ही पहिलीच निवडणूक होती तरीही अनेक तुल्यबळ उमेदवार असल्याने त्यांचा ८ ठिकाणी विजय झाला.
यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ व शिवसेना एकनाथ शिंदे ४ तर भाजप ने पहिल्यांदा नगरपरिषद मध्ये चंचू प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाला एका ठिकाणी विजय मिळवला व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मात्र एका जागेवर समाधान मानावे लागले तेही कोळवन येथील नवख्या उमेदवाराला विजय मिळवता आला.
या निवडणुकीत अनेकांना पहिल्यांदा जाण्याची संधी मिळाली तर अनुभवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण मुनगीनवार यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवार सौ.अंजली खंदार ह्या तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत या हट्रिक माघे त्यांचे दिर सामाजिक कार्यकर्ते शेखर खंदार याचा मोलाचा वाटा आहे.
किंग मेकर साजिद बेग याच्या नेतृत्वाखाली मिळालेला विजय राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. तर सभागृहात साजिद बेग हे निश्चित जातील त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा पक्षाला व शहराला फायदा होईल असे म्हटलं जातं ते नगरादयक्ष नालंदा भरणे यांना प्रशासकिय मोठा अनुभव आहे.

आर्णी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025
प्रभाग क्र. १
(अ) सूरेश पवन चाफळे –शिंदे शिवसेना
(ब) छबू मनोज चारोळे शिंदे शिवसेना
प्रभाग क्र. २
(अ) परशराम देवराव कूमरे राष्र्टवादी अजित पवार
(ब)शेख रुकसाना परविन मोहीबोद्दीन राष्र्टवादी अजित पवार
प्रभाग क्र. ३
(अ) विशाल नारायण मनवर शिंदे शिवसेना
(ब) चैताली विशाल चव्हाण(देशमूख) भाजपा
प्रभाग क्र. ४
(अ) निता खूशाल ठाकरे -काँग्रेस
(ब) अंजली संदिप खंदार राष्र्टवादी अजित पवार
प्रभाग क्र. ५
(अ) अशपाक खालीक शेख राष्र्टवादी अजित पवार
(ब) निलोफर साजीद बेग राष्र्टवादी अजित पवार
प्रभाग क्र.६
(अ) अश्वीनी संजय राऊत – काँग्रेस
(ब) संजय बंडू व्यवहारे –राष्र्टवादी अजित पवार
प्रभाग क्र. ७
(अ) वर्षा विशाल रासमवार –राष्र्टवादी अजीत पवार
(ब) अनवर खान सरदार खान पठान–राष्र्टवादी अजीत पवार
प्रभाग क्र. ८
(अ) शफी अ,रज्जाक मलनस – काँग्रेस
(ब) यास्मिन बानो रहेमान शाह – काँग्रेस
प्रभाग क्र. ९
(अ) भावना जयराज मूनेश्वर–काँग्रेस
(ब) रियाज वाहब सय्यद –काँग्रेस
प्रभाग क्र. १०
(अ) प्रिती योगेश शिवरामवार –काँग्रेस
(ब) अमोल सूधाकर मांगूळकर – काँग्रेस
प्रभाग क्रं,११
(अ)शितल प्रविण काळे उबाठा शिवसेना
(ब) निलेश रमेश गावंडे शिंदे शिवसेना
नगराध्यक्षपदी नालंदा कीसन भरणे यांच्या विजयामुळे काॅग्रेसपक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात विजयी जल्लोष पाहायला मिळाला.

आर्णी नगर परिषदेत अशा प्रकारे पक्षाअंतर्गत उमेदवार निवडून आले आहे
8 नगरसेवक( काँग्रेसपक्ष)
8 नगरसेवक राष्र्टवादी (अजीत पवार गट)
1 नगर सेवक भाजपा
4 नगर सेवक शिंदे शिवसेना
1 नगरसेवक उबाठा शिवसेना
1 काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष

Related posts

काँग्रेस आर्णी शहराध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक वअमोल मांगूळकर यांचे निवस्थानी खा.प्रतिभाताई धानोरकर यांची सदिच्छा भेट…!

bol maharashtra

पचास गुना ज्यादा ताक़त से लड़ूंगा चुनाव,5 वर्षों तक जनता के सुख दुख में रहा शामिल-अरशद खुर्शीद

Web1Tech

परसोडा येथील मोक्षभूमी झाली पर्यटनभूमी…!

bol maharashtra