Bol Maharashtra
Last 24 Hour ब्रेकिंग महाराष्ट्र सामाजिक

देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या कु.तृष्णा ठवकर ची भारतीय नौदलात निवड…!

शिक्षण शिकत असतांनाच देश सेवेचे स्वप्न मनी बाळगत त्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या आर्णी च्या कु.तृष्णा भगवानराव ठवकर ह्या मुलीची निवड भारतीय नौ दलात झाली.

वडिलांचे छत्र काही वर्षा पूर्वी हरवले पण त्यामुळे देश सेवेच्या ध्यासाने झपाटलेल्या कु.तृष्णा ने इयत्ता १० वि नंतर पुणे वाघोली येथे एका खासगी प्रशिक्षण केंद्रात कठोर सराव केला जिद्द व परिश्रम घेत तिने  एन. डी.आर. एफ. ची परीक्षा दिली पण थोडक्यात तेथे संधी हुकली. मात्र जिद्द कायम ठेवत कु.तृष्णा हिने भारतीय नौदलाची परीक्षा दिली त्यात तिला यश मिळाले.

आता समुद्री सुरक्षेसाठी ती नौदलात रुजू होणार आहे. यामुळे कु.तृष्णा हिने पाहलेले देश सेवेचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. जल सुरक्षा हा भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विभाग मानला जातो.समुद्र मार्गी शत्रू च्या हालचाली वर लक्ष देत हल्ले परतवने  व देशाची सुरक्षा व्यवस्था सभाळण्याच्या जोखमीच्या सेवेत तृष्णा हिची निवड झाली आहे त्यामुळे तिच्या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता ४ महिन्याचे खरतड प्रशिक्षण पूर्ण करून पुन्हा २ महिने प्रशिक्षण पूर्ण करत तृष्णा ही आसाम राज्यात सेवेत रुजू होणार आहे.

 

Related posts

५०% आरक्षण मर्यादा ओलांडली आता तेथे दुसऱ्या टप्प्यात निवडणुका..?

bol maharashtra

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची देवराव पाटील शिंदे कॉलेज कडून पथनाट्या द्वारे जनजागृती

bol maharashtra

नाम फाउंडेशनचा मायेचा हात; सिरेसायगावात गरजू महिला शेतकऱ्यांना बियाणे वाटप

bol maharashtra