Bol Maharashtra
Last 24 Hour मोठी बातमी सामाजिक

माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या निधनाने मार्गदर्शक सहकारी हरवला:ना.संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ

स्व.शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेत काम करतांना नेहमीच मला मार्गदर्शन करणारे माझे जिवाभावाचे जेष्ठ सहकारी विश्वास भाऊ नांदेकर सर हे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले त्यांचे निधन हा शिवसेनेला धक्का असून आपण एक निर्भीड रोखठोक भूमिका घेणारा सच्चा मार्गदर्शक सहकारी गमावला असे दुःख यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केले.
संघटना वाढी साठी त्यांची मोलाची भूमिका होती त्यांचे काम सैंधव स्मरनात राहील या दुःखातून त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या समर्थक शिवसैनिक व जनतेला सवरण्यास बळ मिळो अशी प्रार्थना ना.संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केली.

विश्वास नांदेकर सर हे २००४ ते २००९ या कालावधीत वणी विधानसभेचे आमदार होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिले. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य तसेच मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ते नेहमी आक्रमक भूमिका घेत असत.

अन्याय, भ्रष्टाचार आणि शोषणाविरोधात ते तुटून पडणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. जनतेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची त्यांची तयारीच त्यांची ओळख होती. याच निर्भीड आणि आक्रमक स्वभावामुळे त्यांना “शिवसेनेचा वाघ” म्हणून ओळखले जात होते.
बोल महाराष्ट्र परिवारा कडून व शेतकरी सेने कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!

Related posts

तपोवनाच्या वृक्षांना हरित लवादा ची ढाल..!

bol maharashtra

हळव्यामनाचा दिलदार नेता गेला:माजी आमदार ख्वाजा बेग

bol maharashtra

शिव व्याख्याते सचिन दादा पाटील यांचे शिवचरित्रावर धगधगते विचार आर्णीकर नागरिकांना ऐकायला मिळणार…!

bol maharashtra