Bol Maharashtra
बिना केटेगरी

जिल्हा परिषद पंचायत समितचा प्रचार शिगेला आज प्रचाराची तोफ थंडावणार.!

 

प्रतिनिधि संदिप ढाकुलकर

जिल्हा परिषद पंचायत समितचा प्रचार शिगेला आज प्रचाराची तोफ थंडावणार.!

शिक्रापूर (पुणे) होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे सर्वच प्रमुख उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेत जनसंपर्क वाढविला आहे पंचायत समिती भाजपाचे अधिकृत उमेदवार पंढरीनाथ गायकवाड यांचा सुद्धा प्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यांच्या मागचा जनसंपर्क आणि वाढता प्रतिसाद बघता विरोधकाच्या मनात सुद्धा चांगलीच धाकधुक वाढलेली आहे येत्या सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री संपणार आहे त्यामुळे उमेदवारांची प्रत्येक गावात वाडीवर, वस्तीवर मतदार राजांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि उमेदवार पायाला भिंगरी लावून पळत आहे शिक्रापूर या ठिकाणी पंचतारांकित औद्योगिक एमआयडीसी असल्यामुळे येथे कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि इथे स्थायिक झालेले आहे त्यामुळे त्यांचे मतदान सुद्धा याच भागात असल्यामुळे गावातील आणि परिसरातील लोकसंख्या पेक्षा बाहेरच्या मतदानाचा टक्का जास्त आहे त्यामुळे या बाहेरच्याच मतदानावर येथील उमेदवाराचे भविष्य अवलंबून आहे सुज्ञ मतदार राजा आपले अमूल्य मतदान नेमके कोणाच्या झोळीत टाकेल आणि कोणाचा गुलाल उडेल यासाठी नऊ तारखेची प्रतीक्षा करावी लागेल सध्या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये चुरस लागली असून यामध्ये कोण बाजी मारतो याची उत्सुकता सर्व मतदार राजांना लागली आहे

Related posts

समाजाच्या उन्नतीसाठी संतांचे विचार मार्गदर्शक :नां. संजय राठोड

bol maharashtra

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने जीवनदाय महाकुंभ रक्तदान शिबिरास आरंभ..!

bol maharashtra

लाडक्या बहिणींच्या मतावर नक्की दावा कुणाचा…?

bol maharashtra