Bol Maharashtra
बिना केटेगरी

दरगाह ट्रस्ट चा तो उपक्रम ठरत आहेबाबांच्याआशीर्वादाची ऊब देणारा

आर्णी च्या अरुणावती नदी तिरा वरील बाबा कंबलपोश दरगाह आहे हे सर्व धर्म समतेचे प्रतिक असून येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
फुल अथवा कापडी चादर अर्पण करण्याची धार्मिक परंपरा आहे पन दरवर्षी हजारो कापडी चादर जमा होत होत्या त्या पुन्हा उपयोगात येत नव्हत्या
म्हनून गेल्या काही वर्षा पासून दरगाह ट्रस्ट ने एक निर्णय घेतला फुल व कापडी चादर अर्पण करण्या ऐवजी कंबल (ब्लॅंकेट)अर्पण करण्याचे आवाहन केले
सुरवातीला चादर विक्रेते व्यावसायिक नाराज झाले पण नंतर त्यांना हा उपक्रम पटला.
येथे जमा होणाऱ्या कंबल चे वाटप ट्रस्ट तर्फे रुग्णालयात गरजू रुग्ण,वृद्धाश्रम, भिक्षेकरी यांना दिल्या जाते.
यंदा तालुक्यातील उमरी पठार येथील संत डोला महाराज वृद्धाश्रमास १७५ ब्लॅंकेट दिले त्यामुळे बेघर निराधार वृद्धांना मायेची ऊब मिळाली तर पारधी समाजाच्या मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या वस्तीगृहात आम्ही साऱ्या सावित्री च्या लेकीं शैक्षणिक आश्रमालय येथे ५३ ब्लॅंकेट चे वाटप केले ही एक प्रकारची बाबा कंबलपोष यांच्या आशीर्वाद व मायेची ऊब ठरली आहे हा उपक्रम दरगाह समितीचे रियाज बेग व त्यांचे सहकारी राबवितात..या उपक्रमाचे यवतमाळ जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांनीही कौतुक केले आहे.

Related posts

यवतमाळ-आर्णी-माहूर-किनवट रेल्वे मार्गाच्या मागणीला प्रचंड जनसमर्थन

bol maharashtra

परसोडा येथील मोक्षभूमी झाली पर्यटनभूमी…!

bol maharashtra

योग्य उपचारांचे फलित : रुग्णाकडून देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा सन्मान

bol maharashtra