Bol Maharashtra
बिना केटेगरी ब्रेकिंग सामाजिक

परसोडा येथील मोक्षभूमी झाली पर्यटनभूमी…!

आज शहरात नव्हे तर ग्रामीण भागात देझील मोठया प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे.

वेळ घालवण्यासाठी पर्यटन केंद्र शोधावे लागते.गावात तर पूर्वी मारोती देवांचा पार अथवा ओटा असायचा तेथे गावकरी एकत्र जमून गप्पा मारत होते. शहरात खुल्या जागेत लहानमुलांना खेळण्यासाठी व वृद्धांना बसऱ्यांनास उद्यान असते.

माणसाच्या आयुष्याचा शेवट हा स्मशानभूमीत होतो.स्मशानभूमी नाव घेतले तरी अनेक घाबरतात तिकडे सहसा लोक फिरकत नाहीत.

मात्र मृत्य अटळ आहे हे निर्विवाद सत्य आहे. स्मशानभूमी ला आता मोक्ष भूमी देखील म्हणतात.

हीच मोक्ष भूमी जर पर्यटन भूमी झाली तर..?

हो ही किमया केली आर्णी तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत ने सरपंच असतांना तत्कालीन अतुल देशमुख यांनी पुढाकार घेऊन स्मशानभूमीत वृक्षारोपण केले दहन शेड केले.हिरवळ फुलवली जणू एखादे पर्यटन केंद्र वाटावे असे रूप पालटले आहे आता त्यांच्या पत्नी सरपंच आहेत.

ठिबक सिंचन द्वारे स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण करणारी जिल्ह्यातील परसोडा ग्रामपंचायत कौतुकास्पद-आहे असे मत मेहत्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद यवतमाळ यांनी केले.
 :आर्णी तालुक्यातील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान स्पर्धेतील गावांची पाहणी करणे करिता जि प चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहत्रे परसोडा आले असतांना ग्रामपंचायत द्वारे ठिबक सिंचन करून स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण उपक्रमाचे कौतुक केले.
नविन वर्षाचे औचित्य साधून परसोडा ग्रामपंचायत द्वारा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष संगोपन करणे करिता ठिबक सिंचनाचावापर केलेल्याकार्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहत्रे व उपस्थितानी कौतुक केले. ह्यावेळी आर्णी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश खारोडे,विस्तार अधिकारी इंगोले, विस्तार अधिकारी ठाकरे, जि प चे योजना समन्व्यक कुलकर्णी ह्यांची प्रमुख उपस्थिती होती तर वृक्षारोपण उपक्रमात सरपंच प्रा स्वप्ना अतुल देशमुख, उपसरपंच सुनंदा पत्रे, माजी सरपंच अतुल पाटील देशमुख, मुख्याध्यापक बाबाराव वानखडे, शिक्षक विलास वेट्टी,अरुण देशमुख,ज्ञानेश्वर राठोड, मंगला चौधरी,अजाबराव पत्रे,रमेश कोल्हे, फुलसिंग नाईक, राजु देशमुख,गजानन शेळके, शंकर कोल्हे,विनोद पत्रे, कैलास जाधव, स्वप्नील राठोड, नारायण सोळंके,आदित्य देशमुख, राम कोल्हे, ओम पारधी,सुनिल राठोड, रोहिदास तुवर, राहुल तुवर, रोहन तुवर, सिताराम काळे, संतोष चौधरी, प्रविण राठोड, नितीन आडे, पृथ्वीराज राठोड, अर्जुन पवार, उमेश जाधव, संतोष सोळंके,ज्ञानेश्वर राठोड, स्वाती पत्रे, आशा सोळंके,राजश्री कोल्हे, सारिका कोल्हे, मंदा कोल्हे,उषा कोल्हे,पुष्पा जाधव, सविता जाधव,,कल्पना कुडवे, इंदिरा बाई सोळंके, कौसल्या राठोड, कमला राठोड, ललिता राठोड, पाराबाई जाधव,रुखमा आडे, चंदा जाधव यांनी परिश्रम घेतले.

Related posts

आर्णी च्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्व.अजित दादांचे बारामतीत घेतले अंत्यदर्शन

bol maharashtra

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर येथे इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मेळावा आयोजित ..!

bol maharashtra

नगरसेवक अशपाक शेख,राष्ट्रवादी चे पदाधिकारी अलीम देशमुख यांचा वाढदिवस साजरा,ग्रामीण रुग्णालयात केले फळ वाटप..!

bol maharashtra