Bol Maharashtra
Last 24 Hour निवडणूक

महायुती साठी प्रयत्न,जनादेशा चा आदर व्हावा ही आर्णी च्या नागरिकांची इच्छा:सुनील पोदगंटवार

आर्णी नगरपरिषद निवडणुकीत  भारतीय जनता पक्ष, शिवसेना व  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले मत विभाजनाचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नगरादयक्ष निवडून आले. मात्र त्यांना बहुमत नाही.

आता शिवसेनेचे ४ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे १ नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ असे बहुमत आर्णी च्या मतदारांनी दिले.त्या बहुमताचा आदर व्हावा असे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्य सरचिटणीस साजिद भाऊ बेग,जिल्हा अद्यक्ष बाळासाहेब कामारकर यांच्या आदेशाने स्थानिक पातळीवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुती साठी प्रयत्न करू असे आर्णी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुनील पोतगंटवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आर्णी नगरपरिषदेत राष्ट्रवादी महायुती करण्यास तयार, अभद्र युती नको— तालुकाध्यक्ष सुनील पोतगंटवार

नुकत्याच झालेल्या आर्णी नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे मित्रपक्ष एकमेकां विरुद्ध जरी लढत होते तरी त्यांनी एक मेकां विरोधात चिखलफेक केली नाही अथवा टीका टिप्पणी केली नाही. सोहर्दपूर्ण वातावरणात निवडणूक पार पडली. त्यात शिवसेना (शिंदे गट) चे चार तर राष्ट्रवादी (अजित दादा गट)चे 8 व भारतीय जनता पार्टीचे एक असे एकूण 13 नगरसेवक हे महायुतीचे असून त्यात राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की आर्णी शहराचा विकास करण्याकरिता आपण महायुतीचीच सत्ता स्थापन करावी आणी आर्णीच्या विकासात भर टाकावी. आर्णी च्या मतदारांनी महायुतीला बहुमत दिले आहे ज्याचा सन्मान करणे महायुती च्या घटक पक्षांची जबाबदारी आहे. समोरील वाटाघाटीचा विषय संख्याबळानुसार घ्यावा अश्या सूचना पक्षाचे राज्यमंत्री व जिल्याचे नेते इंद्रनील भाऊ नाईक यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पाटील व जिल्हा सरचिटणीस सुरेश मोर्लेवार यांच्या उपस्थितीत तालुकाध्क्ष सुनिल पोतगंटवार यांना दिला आहे.
आम्ही शेवटपर्यंत महायुती साठी प्रयत्नशील राहू.

Related posts

हजारोंच्या साक्षीने साश्रु नयनांनी स्व.वसंतराव शिंदे अनंतात विलीन…!

bol maharashtra

त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान,पुंजानी यांची याचिका उद्याच सुनावणी…!

bol maharashtra

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, आताच मोबाईलवर तपासा मेसेज; मिळेल खूष करणारी बातमी

Web1Tech